esakal | वाहनाखाली वयोवृद्ध चिरडला; श्रीलंकन क्रिकेटरला अटक

बोलून बातमी शोधा

 sri lankas kusal mendis arrested for causing fatal motor accident

sri lankas kusal mendis arrested for causing fatal motor accident 
25 वर्षीय  यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या मेंडिस ने 44 कसोटी आणि 76 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. तो श्रीलंकन राष्ट्रीय संघाचा नियमित सदस्य आहे. 

वाहनाखाली वयोवृद्ध चिरडला; श्रीलंकन क्रिकेटरला अटक
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोलंबो : श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस (Kusal Mendis) याला अपघाताप्रकरणी अटक करण्यात आले आहे. कोलंबोतील पनादुरा उपनगरातील रस्त्यावर त्याच्या वाहनाने एका 64 वर्षीय व्यक्तीला उडवल्याचे वृ्त्त आहे. यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून  याप्रकरणातच त्याला अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. मेंडिसला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  25 वर्षीय  यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या मेंडिस ने 44 कसोटी आणि 76 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. तो श्रीलंकन राष्ट्रीय संघाचा नियमित सदस्य आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावतून सावरत श्रीलंकन संघाने सरावाला सुरुवात केली. यात त्याचाही समावेश होता.

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोना विषाणूमुळे क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील नियोजित दौराही रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. मेंडिसने 2015 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कसोटीमध्ये त्याच्या नावे 7 शतक आणि 11 अर्धशतकाची नोंद आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 2 शतके आणि 17 अर्धेशतके झळकावली आहेत. टी-20 मध्येही त्याच्या नावे 5 अर्धशतके आहेत.