दहशतवादी हल्लाची भीती तरीही श्रीलंकेचा संघ पाकमध्ये दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

दहशतवादी हल्ल्याची भीती असतानाही श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर रवाना झाला. सुरक्षिततेबाबत दिलेले शब्द पाकिस्तानकडून पाळला जाईल अशी अपेक्षा श्रीलंका संघ करत आहे. 

कोलंबो : दहशतवादी हल्ल्याची भीती असतानाही श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर रवाना झाला. सुरक्षिततेबाबत दिलेले शब्द पाकिस्तानकडून पाळला जाईल अशी अपेक्षा श्रीलंका संघ करत आहे. 
2009 मध्ये लाहोर येथे श्रीलंका संघाच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिलेला आहे. त्यानंतर अमिराती हे पाकिस्तान संघाचे होम ग्राऊंड झालेले आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा पाकिस्तानमध्ये परतावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने श्रीलंकेचा हा मर्यादित षटकांचा दौरा आयोजित केला. सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली तरी श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली. यातील पहिला ट्‌वेन्टी-20 सामना शुक्रवारी होत आहे. 

श्रीलंकेच्या ट्‌वेन्टी-20 संघाचा कर्णधार दासुन शनाका पाकिस्तानमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. 2017 मध्ये श्रीलंकेचा संघ लाहोरमध्ये ट्‌वेन्टी-20 चा एक सामना खेळलेला आहे. पाकिस्तानमध्ये मी याअगोदरही खेळलेलो असल्यामुळे भीती वाटत नाही. त्यांनी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर आम्ही समाधानी आहोत, असे तो म्हणाला. एकदिवसीय संघाचा कर्णधार लाहिरू थिरिमने यानेही सुरक्षिततेबाबत समाधान व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Srilankan team reaches Pakistan despite threat of terror attack