सिनक्‍युफिल्ड करंडक बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला संयुक्त दुसरा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

सेंट लुईस, मिसुरी - भारताच्या विश्‍वनाथन आनंद याला सिनक्‍युफिल्ड करंडक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्‍त दुसरा क्रमांक मिळाला. नऊ फेऱ्यांच्या स्पर्धेत त्याचे ५.५ गुण झाले. मॅग्नस कार्लसन याचेही एवढेच गुण झाले. सात बरोबरी आणि दोन विजय अशी अपराजित कामगिरी त्याने केली. याबरोबरच त्याने जागतिक क्रमवारीत सातवे स्थान गाठले. अखेरच्या फेरीत आनंदने वेस्ली सो याच्याशी काळ्या मोहऱ्यांसह बरोबरी साधली. मॅक्‍झीम वॅचीएर-लॅग्रेवने सहा गुणांसह विजेतेपद मिळविले. अखेरच्या फेरीत त्याने इयान नेपोमियांछी याला हरविले.

इतर डावांत मॅग्नस कार्लसन याने लेव्हॉन अरोनीयनला, तर पीटर स्वीडलने फॅबियानो कॅरुआनाला हरविले. हिकारू नाकामुरा व सर्जी कॅर्जाकीन यांच्यात बरोबरी झाली. अंतिम क्रमवारी - १) मॅक्‍झीम वॅचीएर-लॅग्रेव (६), २-३) मॅग्नस कार्लसन, विश्‍वनाथन आनंद (प्रत्येकी ५.५), ४-५) लेव्हॉन अरोनियन, सर्जी कॅर्जाकीन (प्रत्येकी ५), ६) पीटर स्वीडलर (४.५), ७) फॅबियानो कॅरुआना (४), ८) हिकारू नाकामुरा (३.५), ९-१०) वेस्ली सो, इयान नेपोमियांछी (प्रत्येकी ३).

Web Title: ssports news chess competition