राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा परीक्षेच्या फेऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 जानेवारी 2019

मुंबई - मुंबई विद्यापीठाला तब्बल २० वर्षांनंतर अश्‍वमेध क्रीडा महोत्सव  (राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धा) आयोजित करण्याचा मान मिळाल्यानंतरही हा महोत्सव नियोजित कालावधीत भरविण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यासाठी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मात्र, हा कालावधी विद्यापीठ, तसेच स्पर्धा परीक्षांचा असल्यामुळे विद्यार्थ्यांवर दोन्हीपैकी एकाचीच निवड करण्याची वेळ आली आहे.  

आंतरविद्यापीठ अश्‍वमेध क्रीडा महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठे सहभागी होतात. बास्केटबॉल, ॲथलेटिक्‍स,  कबड्डी, खो-खो आणि व्हॉलिबॉल या स्पर्धा होतात. यंदा महोत्सव आयोजित करण्याचा मान मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे. स्पर्धेचे आयोजन स्पर्धेला सुरवात झाल्यापासून नोव्हेंबरच्या अखेरीस आयोजित करण्यात येते. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळासाठी पूर्ण वेळ देता येतो; परंतु यंदा मुंबई विद्यापीठाने हा महोत्सव आयोजित करण्याकडे काहीसे दुर्लक्ष केले आहे. तब्बल २० वर्षांनंतर स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतरही विद्यापीठाने हा महोत्सव भरविण्याकडे काणाडोळा केल्याने महोत्सव लांबणीवर पडला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

विद्यापीठांचे विविध महोत्सव असल्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यास विलंब झाल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी महोत्सव भरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. हा महोत्सव १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्याचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाने विद्यापीठांचे कुलपती आणि राज्याचे राज्यपाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. अनेक विद्यापीठांच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल; अन्यथा त्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

अश्‍वमेध क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचा प्रस्ताव राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला येत्या एक-दोन दिवसांत मंजुरी मिळेल. 
- यू. एन. केंद्रे, प्रभारी संचालक, क्रीडा विभाग

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Inter College Sports Competition