State Kabaddi Championship: राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर अन् मुंबई शहराला विजेतेपद

State Kabaddi Championship: ठाणे येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर व मुंबई शहर संघांनी विजेतेपदक पटकावले.
State Kabaddi Championship winner Kolhapur
State Kabaddi Championship winner Kolhapuresakal
Updated on

State Kabaddi Championship Winner Kolhapur and Mumbai City: राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुषांमध्ये कोल्हापूर, तर महिलांमध्ये मुंबई उपनगरने अजिंक्यपदाचा मान मिळवला.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने अहिल्यानगरचा ४२-३२ असा पराभव केला. याआधी त्यांनी शिरोळ, कोल्हापूर येथे २००३ मध्ये झालेल्या स्पर्धेत पहिल्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.कोल्हापूरने विश्रांतीला १८-१३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा लोण देत २६-१६ अशी आघाडी वाढविली. तिसरा लोण देत आपली आघाडी ३८-२४ अशी भक्कम केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com