राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत पुणे अजिंक्य

नागेश पाटील
रविवार, 9 डिसेंबर 2018

चिपळूण - येथील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात झालेल्या 47 वी महिला हॅण्डबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे संघाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील सर्वोकृष्ठ खेळाडू म्हणून पुणे संघाच्या स्मिता पवार हिला गौरवण्यात आले. 

चिपळूण - येथील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात झालेल्या 47 वी महिला हॅण्डबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे संघाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील सर्वोकृष्ठ खेळाडू म्हणून पुणे संघाच्या स्मिता पवार हिला गौरवण्यात आले. 

उपांत्यपूर्व फेरीतून पुणे, नागपूर, कोल्हापूर व सोलापूर संघाने उपांत्यफेरीत धडक मारली होती. उंपात्य फेरीतील पहिला सामना पुणे व नागपूर यांच्यात झाला. अटीतटीच्या सामन्यात पुणे संघाने 14 तर नागपूर संघाने 13 गोल केले. नागपूर संघास पुणे संघाचा बचाव भेदता आला नाही. परिणामी पुणे संघाने एका गुणांनी सामना जिंकून अंतिम फेरी गाठली. दुसरा सामना सोलापूर विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. सोलापूर संघाने 10 तर कोल्हापूर संघाने 18 गोल केले.

कोल्हापूर संघाने 8 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. कोल्हापूर व पुणे संघात अंतिम लढत झाली. पुणे संघाने 16 तर कोल्हापूर संघाने 14 गोल केले. कोल्हापूरचा संघ बाजी मारेल अशी शक्यता होती. मात्र पुणे संघाने वेगवान खेळ करीत कोल्हापूर संघाचा बचाव भेदून विजेतेपद पटकावले.

पुणे संघातील चार राष्ट्रीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने संघाचा विजय सोपा झाला. तिसर्‍या क्रमांकासाठी सोलापूर व नागपूर यांच्यात लढत झाली. नागपूरने 11, तर सोलापूर संघाने केवळ 6 गोल केले. परिणामी नागपूर संघाने 5 गुणांनी विजय मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.

सोलापूर संघास चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील सर्वोकृष्ठ खेळाडू म्हणून पुणे संघाच्या स्मिता पवार यांना गौरवण्यात आले. पवार या सध्या पोलिस दलात कार्यरत आहेत. तहसीलदार जीवन देसाई, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटविकास अधिकारी सरिता पवार, पंचायत समितीचे अधिकारी, रत्नागिरी जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन अध्यक्ष दत्तात्रेय पाटील,  समिती सचिव राजेश गाडे व असोसिएशन पदाधिकार्‍यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

Web Title: State lever Handball competition