स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला; संगकारासह सचिनलाही टाकले मागे

Steve Smith Broke Record
Steve Smith Broke Record esakal

लाहोर: ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) पाकिस्तान विरूद्ध लाहोरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत एक मोठा इतिहास रचला. कसोटीच्या चौथ्या दिवशी फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) आपल्या 8000 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे स्टीव्ह स्मिथ सर्वात वेगवान 8000 कसोटी धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने दुसऱ्या डावात 17 धावांची छोटी खेळी केली मात्र या खेळीद्वारे त्याने मोठा विक्रम मोडला. (Steve Smith Broke Record)

Steve Smith Broke Record
MS Dhoni | धोनी 'दुसरा' धक्का देणार की...

स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीला एक चांगला कव्हर ड्राईव्ह मारत आपल्या कसोटीतील 8000 धावा पूर्ण केल्या. स्मिथने 85 कसोटीमधील 151 व्या डावात ही कामगिरी करून दाखवली आहे. यापूर्वी सर्वात वेगावान 8000 कसोटी धावा पूर्ण (Fastest 8000 Test Runs) करण्याचा मान हा श्रीलंकेच्या कुमार संगकाराकडे होता. त्याने त्याने 152 कसोटी डावात आपल्या 8000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर या यादीत दुसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर (154 डाव), वेस्ट इंडीजचे सर ग्राफेल्ड सोबर्स (157 डाव) तिसऱ्या तर राहुल द्रविड (158 डाव) चौथ्या स्थानावर आहेत.

Steve Smith Broke Record
धोनीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रैनाने केले ट्विट, म्हणाला...

स्टीव्ह स्मिथ हा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करणारा 33 वा फलंदाज ठरला आहे तर ऑस्ट्रेलियाकडून अशी कामगिरी करणारा स्मिथ हा सातवा फलंदाज आहे. स्टीव्ह स्मिथने आपली कारकिर्द ही एक लेग स्पिनर म्हणून सुरू केली होती. त्याने 2010 मध्ये पाकिस्तानविरूद्ध आपले पदार्पण केले होते. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झाला होता. पाकिस्तान विरूद्धची ही मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात आली होती. मात्र कालांतराने तो ऑस्ट्रेलियाचा एक महत्वाचा फलंदाज झाला. त्याने 27 कसोटी शतके ठोकली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com