esakal | अखेर विराटच्या वरचढ क्रिकेटपटू मिळाला; याने घेतली विराटचा अव्वल क्रमांक
sakal

बोलून बातमी शोधा

Steve Smith reclaims number one Spot is ICC Test Ranking

ऍशेस मालिकेतील जबरदस्त कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल हटवत पहिले स्थान मिळविले आहे. 

अखेर विराटच्या वरचढ क्रिकेटपटू मिळाला; याने घेतली विराटचा अव्वल क्रमांक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई : ऍशेस मालिकेतील जबरदस्त कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल हटवत पहिले स्थान मिळविले आहे. 

आयसीसीने आज (मंगळवार) प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत स्मिथ कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विराट या स्थानावर कायम होता. पण, वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने त्याला हे स्थान गमवावे लागले आहे. तर, दुसरीकडे स्मिथ इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत संघाबाहेर असूनही त्याने पहिले स्थान मिऴविले आहे. त्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आता तो चौथ्या कसोटीतून संघात पुनरागमन करत आहे.

कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटीत 136 धावा केल्या आहेत. तर, स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी तब्बल 338 धावा केल्या आहेत. स्मिथची हीच कामगिरी त्याला विराटच्या स्थानावर जाण्यापासून रोखू शकली नाही. मात्र, या दोघांमध्ये अवघ्या एका गुणाचे अंतर आहे.

इंग्लंडविरुद्धच्या आगामी दोन कसोटी चांगली कामगिरी करून स्मिथला गुणांचे हे अंतर वाढविण्याची संधी आहे. यापूर्वी स्मित 2015 आणि 2018 मध्ये अव्वल स्थानावर होता. पण, त्यानंतर एक वर्षांच्या बंदीमुळे त्याच्या क्रमवारीवर परिणाम झाला होता. आता विराट मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत खेळताना दिसेल. फलंदाजांच्या क्रमवारीत अजिंक्य रहाणेनेही पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे.

loading image
go to top