
Steve Smith : चेंडू अधिक फिरकी घेईल या आशेने... खेळपट्टीबाबत स्टीव्ह स्मिथ हे काय म्हणाला?
IND vs AUS 1st Test Day 2 Steve Smith : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने कागारूंना 177 धावात गुंडाळले. तसेच 1 बाद 77 धावा करून सामन्यावर पहिल्या दिवशीच पकड मिळवली.
यानंतर ऑस्ट्रेलियातील क्रिकेट पंडित हे खेळपट्टीच्या नावाने गळा काढत होते. मात्र या सर्वांना नागपूरच्या खेळपट्टीवर फलंदाजी केलेल्या स्टीव्ह स्मिथने घरचा आहेर दिला आहे.
अनुभवी स्मिथने सँडपेपरगेट घोटाळ्यानंतर कर्णधारपद गमावण्यापूर्वी 36 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आणि मागील दोन हंगामात काळजीवाहू कर्णधार म्हणून काही कसोटी सामन्यांची जबाबदारी स्वीकारली.
तो म्हणाला की नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी हे दोघेही ऑफस्पिनर असले तरी. ते वेगळे आहेत आणि ते वेगळ्या पद्धतीने कार्य करतात.
चेंडूवर अधिक फिरकी मिळण्याच्या आशेने आपले काही फलंदाज खराब फटके खेळून बाद झाल्याचे स्मिथने मान्य केले. जेव्हा चेंडू खेळपट्टीवर फिरतो तेव्हा असे होते.
लबुचेन आणि रोहित शर्मा यांनी दाखविल्याप्रमाणे ती खराब खेळपट्टी नव्हती आणि धावा करणे शक्य होते, असे त्याने कबूल केले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने सांगितले की, जडेजाने चांगली गोलंदाजी केली. आता तो म्हणाला की, भारताला किमान धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न असेल.