Stuart Broad : इंग्लंडच्या ब्रॉडचा मोठा विक्रम! ग्लेन मॅग्राला टाकले मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stuart Broad Surpasses Australia Glenn McGrath

Stuart Broad : इंग्लंडच्या ब्रॉडचा मोठा विक्रम! ग्लेन मॅग्राला टाकले मागे

England Vs South Africa 3rd Test : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला 36 धावांवर बाद करत कसोटी क्रिकेटमधील आपला 564 वा बळी टिपला. याचबरोबर त्याने कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत ग्लेन मॅग्राला मागे टाकले. आता तो त्याचा संघ सहकारी जेम्स अँडरसन याच्या मागे आहे. अँडरसनने कसोटीत 666 विकेट्स घेतल्या आहेत. (Stuart Broad Surpasses Australia Glenn McGrath become the second highest wicket-taker pacers in Test cricket)

हेही वाचा: VIDEO | ENGW vs INDW : रिचा घोषचा 'धोनी स्टाईल' स्वॅग होतोय व्हायरल

स्टुअर्ट ब्रॉडने एल्गरची शिकार करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचला. या यादीत 800 विकेट्स घेणारा श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (708) आहे. तर तिसऱ्या स्थानावर 666 विकेट घेणारा इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. भारताच्या अनिल कुंबळेचा चौथा नंबर लागतो. त्याने 619 विकेट घेतल्या आहेत. आता या यादीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड देखील सामिल झाला आहे. तो आता 565 विकेट्स घेऊन पाचव्या स्थानावर आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना सध्या रंगतदार स्थितीत पोहचला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात आफ्रिकेला 118 धावांवर रोखले होते. मात्र आफ्रिकेनेही जोरदार कमबॅक करत इंग्लंडला 158 धावांवर रोखले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात फक्त 40 धावांचीच आघाडी मिळाली.

Web Title: Stuart Broad Surpasses Australia Glenn Mcgrath To Become The Second Highest Wicket Taker Pacers In Test Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..