VIDEO : फुटबॉलपटू सुनिल छेत्रीला लागलंय क्रिकेटचं 'याड' | Sunil Chhetri Playing Cricket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Chhetri Playing Cricket

VIDEO : फुटबॉलपटू सुनिल छेत्रीला लागलंय क्रिकेटचं 'याड'

सुनिल छेत्री (Sunil Chhetri) हा भारताचा स्टार फुटबॉलपटू आहे. त्याच्या खेळाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते. त्याची आंतरराष्ट्रीय गोल करण्यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिऑनेल मेस्सीबरोबर स्पर्धा असते. असा हा भारताचा स्टार फुटबॉलरला क्रिकेटचं (Cricket) 'याड' लागलं आहे. सुनिल छेत्रीचा थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रथम बीसीसीआयने शेअर केला होता.

हेही वाचा: धक्कादायक! टी 20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवानला दिले होते प्रतिबंधित औषध?

सुनिल छेत्रीने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रविवारी फिल्डिंग ड्रिल्समध्ये सहभाग नोंदवला. त्याने एनसीएमधील नॉर्थइस्ट आणि प्लेट संघातील खेळाडूंबरोबर सराव केला. या खेळाडूंसोबत त्याने आपला फुटबॉलचा प्रवास आणि झालेली जडणघडण देखील शेअर केली. बीसीसीआयने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. बीसीसीआय व्हिडिओ ट्विट करत म्हणते की, 'राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शेजारी असणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि दिग्गज सुनिल छेत्रीने रविवारी फिल्डिंग ड्रिल्समध्ये (Fielding Drills) भाग घेतला. त्याने आपल्या जीवनप्रवासातून शिकलेल्या गोष्टी नॉर्थइस्टच्या तरूण क्रिकेटरसोबत शेअर केल्या.'

हेही वाचा: MS धोनीचा वयाच्या 40 व्या वर्षी एक आणखी पराक्रम

सुनिल छेत्री हा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा चांगला मित्र आहे. या दोघांनी 2021 मध्ये इन्स्टाग्राम लाईव्ह द्वारे संवाद साधत नवी दिल्लीतील आपल्या लहाणपणाबद्दल गप्पा मारल्या होत्या. 37 वर्षाच्या सुनिल छेत्रीने 125 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघातील या फॉरवर्ड खेळाडूने 80 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्या पुढे ख्रिस्तियानो रोनाल्डो (115) तर लिओनेल मेस्सी (81) हे दोन दिग्गज फुटबॉलपटू आहेत.

Web Title: Sunil Chhetri Playing Cricket In Nca Participate Fielding Drills With Northeast Cricketers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top