Sunil Gavaskar Dance : पाकला लोळवले! 73 वर्षाचे गावसकर लहान मुलासारखे नाचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Gavaskar Dance

Sunil Gavaskar Dance : पाकला लोळवले! 73 वर्षाचे गावसकर लहान मुलासारखे नाचले

Sunil Gavaskar Dance : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा चार विकेटने पराभव केला. टीम इंडियाने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. काळजाचे ठोके थांबवणाऱ्या या सामन्यात अश्विनने शेवटच्या चेंडूवर धाव घेत भारताला विजय मिळवून दिला. या विजयानंतर मैदानात उपस्थित भारताचे दिग्गज खेळाडूही विजयाच्या जल्लोषात बुडून गेले.

हेही वाचा: Video | IND vs PAK : पाहा हृदयाचे ठोके चुकवणारी शेवटची ओव्हर

भारताच्या विजयानंतर लिटल मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले 73 वर्षीय सुनील गावसकरने ही नाचायला सुरुवात केली. इरफान पठाण आणि के श्रीकांतसारखे दिग्गजही त्याच्यासोबत मैदानात उपस्थित होते आणि विजयाच्या जल्लोषात मग्न झाले. श्रीकांत एका हातात बॅग घेऊन सेलिब्रेशन करत होता. त्याचवेळी इरफान इतर लोकांशी हात जोडून आनंद व्यक्त करत होता. स्पोर्ट्स अँकर जतीन सप्रू देखील या दिग्गजांसोबत होता आणि भारताच्या विजयाचा आनंद साजरा करत होता.

हेही वाचा: भारतीय संघाच्या पाकिस्तानवरील विजयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

इरफानने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, "एमसीजीमध्ये येथे काय दृश्य आहे. महान सुनील गावसकर देखील स्वतःला रोखू शकले नाहीत. विराट, तू भारताचा खरा राजा आहेस."

हेही वाचा: Babar Azam : बाबर बोलला! ... म्हणून मी शेवटचं षटक नवाझला दिलं होतं

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आठ गडी गमावून 159 धावा केल्या. शान मसूदने 52 आणि इफ्तिखार अहमदने 51 धावा केल्या. शेवटी शाहीन आफ्रिदीने आठ चेंडूत 16 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी तीन बळी घेतले. भुवनेश्वर आणि शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात भारताने सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहलीने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने हार्दिकसोबत 113 धावांची भागीदारी केली. हार्दिकने 40 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.