Video | IND vs PAK : पाहा हृदयाचे ठोके चुकवणारी शेवटची ओव्हर

बाबर आझमची अंपायरशी भांडण... भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या षटकाचा थरार
india vs pakistan last over drama
india vs pakistan last over dramasakal

India vs Pakistan Last Over Drama : मेलबर्न येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळवला. या सामन्यात थ्रिलची अजिबात कमतरता नव्हती, पण सामन्याच्या शेवटच्या षटकाने रोमांचच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला मोठ्या सामन्याचा खेळाडू का म्हटले जाते.

मोहम्मद नवाजच्या या षटकात क्रिकेट चाहत्याला नखे तोंडात घालायला लावली. क्रिकेट चाहत्यांना ही शेवटची षटक नेहमी लक्षात राहिल, कारण या षटकात जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. भारताने दोन विकेट गमावल्या, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने अंपायरशी वाद घातला. पण शेवटी विजय टीम इंडियाचाच झाला.

india vs pakistan last over drama
Babar Azam : बाबर बोलला! ... म्हणून मी शेवटचं षटक नवाझला दिलं होतं

भारतीय संघाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. हार्दिक स्ट्राइकवर होता आणि चेंडू फिरकीपटू मोहम्मद नवाजच्या हातात होता. अशा स्थितीत हार्दिक पहिल्या तीन चेंडूंवर सामना संपवेल असे सर्वांना वाटत होते, मात्र तसे झाले नाही आणि नवाजच्या पहिल्याच चेंडूने हवेत मारत हार्दिकने आपली विकेट गमावली. त्यानंतर पहिल्या तीन चेंडूत केवळ 3 धावा झाल्या. सामना भारतीय संघाच्या हाताबाहेर जाईल असे वाटत होते, पण त्यानंतर मोहम्मद नवाजने सर्वात मोठी चूक केली. नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली. विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 ला 6 धावा असा आणला.

india vs pakistan last over drama
Virat Kohli : सर्वोत्तम इनिंग! पांड्याने दिला खास सल्ला, कोहलीची कारकिर्दितील 'विराट' खेळी

नाटक अजून संपले नव्हते. नवाजच्या फ्री हिट चेंडूवर विराटला मोठा फटका मारायचा होता, पण तो बोल्ड झाला. मात्र फ्री हिट होता तो बाद होऊ झाला नाही, त्यामुळे भारतीय खेळाडूंनी संधीचा फायदा घेत तीन धावा घेतल्या. चेंडू विकेटला लागला, त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू अंपायरशी वाद घालताना दिसले. पुढच्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेला दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाजने वाईड टाकत सामना भारताच्या खिशात टाकला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजय साकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com