Sunil Gavaskar On Sanju Samson : याची कारकीर्दच बदलणार... गावसकरांना संजूच्या शतकी खेळीतील कोणती गोष्ट जास्त भावली?

Sunil Gavaskar On Sanju Samson
Sunil Gavaskar On Sanju Samsonesakal

Sunil Gavaskar On Sanju Samson : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज संजू सॅमसनने आज आपली आठ वर्षांची प्रतिक्षा संपवली. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले पहिले शतक ठोकले. संजूने भारताची अवस्था 2 बाद 49 धावा अशी झाली असताना डाव सावरला. त्याने केएल बाद झाल्यानंतरही दमदार फलंदाजी करत भारताला 296 धावांपर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला.

Sunil Gavaskar On Sanju Samson
Sanju Samson : अखेर 40 सामन्यानंतर तो योग आला; संजूचं शतक केरळसाठी का आहे खास?

संजूच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी देखील संजूची पाठ थोपटली. स्टार सोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले, 'संजूच्या या इनिंगमधील त्याचे शॉट सिलेक्शन मला जास्त आवडले. तो कायम चांगली सुरूवात करून बाद होत होता. कारण त्याचं शॉट सिलेकेशन चुकत होती. आज तो खराब चेंडूची वाट पाहत होता.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'मला वाटतं की ही शतकी खेळी संजूची कारकीर्द बदलणार ठरणार. या शतकानंतर त्याला आता अजून संधी मिळणार आहेत. मला असे वाटते की त्याने आता मी आंतरराष्ट्रीय स्तरावारच खेळण्यसाठी योग्य आहे असा विश्वास बाळगायला हरकत नाही. कधी कधी तुम्ही तिथं असता मात्र तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही.

Sunil Gavaskar On Sanju Samson
KL Rahul : धोनीनंतर केएलच! जे ऋषभ पंतला जमलं नाही ते राहुलनं करून दाखवलं

एक चांगला चेंडू, चांगला झेल आणि वाईट निर्णयामुळे तुम्ही बाद होता. या सर्व गोष्टी तुम्हाला मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास पात्र आहे की नाही अशी शंका निर्माण करतात. मात्र हे शतक त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होऊ शकतो याचा आत्मविश्वास देणारी ठरले.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com