शेन वॉर्नवरील वादग्रस्त वक्तव्यावर अखेर गावसकरांचा माफीनामा

Sunil Gavaskar Expressed Regret Over Shane Warne Controversial Statement
Sunil Gavaskar Expressed Regret Over Shane Warne Controversial Statement esakal

नवी दिल्ली: भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) गेल्या दोन दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर (Shane Warne Death) त्याच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्ये (Controversial Statement) केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, सुनिल गावसकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे. त्यांनी अशी वक्तव्ये करण्याची ही वेळ नव्हती असे सांगितले.

Sunil Gavaskar Expressed Regret Over Shane Warne Controversial Statement
Women's Day : झाशीच्या राणीचा वारसा चालवणाऱ्या मैदानावरील 7 सुपर मॉम

सुनिल गावसकर यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'मला आता पश्चाताप होतोय की तो प्रश्न विचारला जाऊ नये आणि मी त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला नको होते. तुलना आणि चिकित्सा करण्याची ही योग्य वेळ नव्हती.' गावसकर पुढे म्हणाले की, 'शेन वॉर्न हा क्रिकेटमधला (Cricket) एक महान खेळाडू होता. रोडनी मार्श हा सर्वोत्तम विकेटकिपर पैकी एक होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.' गावसकरांनी वादग्रस्त वक्तव्याबाबत सांगितले की त्यांनी फक्त एका प्रश्नावर प्रामाणिकपणे आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला होता.

Sunil Gavaskar Expressed Regret Over Shane Warne Controversial Statement
डावखुरे विशेष असतात, पाकच्या फातिमाला भारताकडून खूप सारं प्रेम : स्मृती

सुनिल गावसकरांनी शेन वॉर्नने जादुई गोलंदाजी केली होती. त्याने अवघड अशा लेग स्पिन गोलंदाजीत महारत मिळवली होती. मात्र तो सर्वोत्तम फिरकीपटू (Great Spinner) नव्हता. त्याचा भारताविरूद्ध त्याची कामगिरी सर्वसाधारणच होती. असे वक्तव्य केले होते. त्यानंतर माध्यमांधील काही लोकांनी त्यावर अशी टिप्पणी करण्याची ही वेळ नाही असे मत व्यक्त केले होते. शेन वॉर्नने 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 145 कसोटी सामने खेळत 708 विकेट घेतल्या होत्या. तर 194 वनडे सामन्यात 293 विकेट घेतल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com