Sunil Gavaskar on Virat Kohli
Sunil Gavaskar on Virat KohliSAKAL

फक्त 20 मिनिट द्या! कोहलीला परत फॉर्ममध्ये आणतो; दिग्गज खेळाडूचा दावा

टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूने विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर केले मोठे वक्तव्य
Published on

Sunil Gavaskar on Virat Kohli : गेल्या काही काळापासून टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत आहे. इंग्लंड दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा भाग असलेला कोहली एकदाही मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याच्या या खराब फॉर्मवर टीम इंडियाच्या माजी दिग्गज फलंदाजाने इंग्लंड मालिकेनंतर मोठे वक्तव्य केले आहे.

Sunil Gavaskar on Virat Kohli
बेन स्टोक्सची अचानक निवृत्तीवर विराट कोहली म्हणाला...

विराट कोहलीचा खराब फॉर्म सध्या प्रत्येक भारतीय चाहत्यासाठी चिंतेचा विषय झाला आहे. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विराट कोहली जवळपास महिनाभराच्या विश्रांतीवर आहे. आता भारताचे दिग्गज सुनील गावसकर याने मोठे वक्तव्य केले आहे.

इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर पुन्हा पुन्हा आऊट होत होता. एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, विराटसोबत मी २० मिनिटे बोलले तर तो ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू खेळण्याच्या समस्येवर नक्कीच मात करू शकतो.

Sunil Gavaskar on Virat Kohli
एकाच दिवसात वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गजांची निवृत्ती

इंग्लंड दौऱ्यावरही कोहलीची बॅट शांत राहिली या दौऱ्यात त्याने 11, 20, 1, 11, 16, 17 धावा केल्या. विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतून विश्रांती घेतली आहे. विराटला ब्रेकवर जाण्यापूर्वी इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आपला फॉर्म पुन्हा परत आणण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com