Sunil Gavaskar : राशीद खान हा भरवशाचा खेळाडू - सुनील गावसकर

राशीद खान हा क्रिकेटच्या तिन्ही बाबींमध्ये सर्वस्व पणाला लावतो. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यामध्ये झोकून देतो. शारीरिक दुखापतीकडेही तो लक्ष देत नाही. अन्‌ याच कारणामुळे तो भरवशाचा क्रिकेटपटू ठरतो.
sunil gavaskar says best cricket player is rashid khan t20
sunil gavaskar says best cricket player is rashid khan t20Sakal

नवी दिल्ली : राशीद खान हा क्रिकेटच्या तिन्ही बाबींमध्ये सर्वस्व पणाला लावतो. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यामध्ये झोकून देतो. शारीरिक दुखापतीकडेही तो लक्ष देत नाही. अन्‌ याच कारणामुळे तो भरवशाचा क्रिकेटपटू ठरतो.

त्यामुळेच जगभरातील टी-२० लीगमध्ये त्याला सर्वाधिक पसंती असते, अशा शब्दांत भारताचे महान खेळाडू सुनील गावसकर यांनी राशीद खानच्या खेळाचे कौतुक केले आहे. राजस्थानविरुद्धच्या बुधवारी झालेल्या लढतीत अखेरच्या षटकात १५ धावांची आवश्‍यकता असताना राशीद खान याने गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याने नाबाद २४ धावांची खेळी साकारली.

याच पार्श्वभूमीवर सुनील गावसकर म्हणाले, या लढतीत त्याला मनाजोगते फटके मारायला जमत नव्हते; पण तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा गुजरातला त्याची गरज होती. त्याने दबावाखाली आपला खेळ उंचावला व विजय मिळवून दिला. याच कारणामुळे जगभरातील टी-२० लीगमध्ये तो सर्वांना हवाहवासा वाटतो.

सुनील गावसकर पुढे कौतुक करताना म्हणतात की, राशीद खान फलंदाजी व गोलंदाजीत ठसा उमटवतोच; पण क्षेत्ररक्षणातही तो उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. गोलंदाज ज्या हाताने गोलंदाजी करतो, तो हात व खांदा क्षेत्ररक्षण करताना सांभाळला जातो; पण राशीद खान याकडे बघत नाही. तो बिनधास्त मैदानात झोकून देतो. तो प्रत्येक बाबींमध्ये १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो.

शुभमन गिलचे कौतुक

सुनील गावसकर यांनी या वेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याच्या फलंदाजीचेही कौतुक केले. ते म्हणाले, आधीच्या लढतींमधून गिल शिकला. संघाला गरज असताना संयमी फलंदाजी करणे आवश्‍यक आहे, हे त्याला समजले. एका बाजूने फलंदाज बाद होत असतानाही तो खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने छान फलंदाजी केली.

राशीद खानप्रमाणे बेन स्टोक्सही मैदानात उतरल्यानंतर सर्वस्व पणाला लावतो. याच कारणामुळे प्रशिक्षक व कर्णधारांना अशा प्रकारचे अष्टपैलू खेळाडू आपल्या संघात घ्यावे, असे वाटत असते.

- सुनील गावसकर, समालोचक, माजी कर्णधार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com