Sunil Gavaskar Criticizes ECB for Retiring Pataudi Trophy : इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून (ईसीबी) पतौडी ट्रॉफी ‘निवृत्त’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या मालिकेपूर्वी या ट्रॉफीचे नाव बदलले जाईल, अशी माहिती आहे. दरम्यान, या निर्णयावरून भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ईसीबीवर कडाडून टीका केली आहे.