काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Sunrisers Leeds news: सनरायझर्स लीड्सने इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या 'द हंड्रेड लीग'साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. सनरायझर्स लीड्स हा 'द हंड्रेड'मध्ये सहभागी होणारा एक संघ आहे.
Sunrisers Leeds captain

Sunrisers Leeds captain

ESakal

Updated on

काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्स फ्रँचायझीने इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या 'द हंड्रेड' या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. यावेळी संघाने २८ वर्षीय इंग्लंडचा स्टार फलंदाज जॅक क्रॉलीवर मोठी बाजी लावत त्याला कर्णधारपद दिले आहे. यापूर्वी संघाचे नेतृत्व हॅरी ब्रूक करत होता. परंतु या हंगामात ब्रूक कर्णधारपदाच्या कोणत्याही दबावाशिवाय फलंदाज म्हणून मैदानात उतरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com