IPL 2019 : धोनी, रोहित येतील जातील पण रैनाच ट्वेंटी20चा किंग

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

आयपीएल 2019 : चेन्नई : ट्वेंटी 20क्रिकेट त्यातूनही आयपीएल म्हटलं की सुरेश रैनाचा हात कोमीच नाही धरु शकत हे सर्वांना मान्य आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रैनाने पुन्हा एकदा आपण ट्वेंटी20 क्रिकेटचे किंग असल्याचे सिद्ध केले. 

रैनाने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये भारतीय मैदानांवर सहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. राजस्थानविरुद्ध एम चिदंबरम मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला आहे. 

काल झालेल्या सामन्यात त्याने 36वी धाव घेतल्यावर हा विक्रम त्याच्या नावावर झाला. ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये त्याने 288 डावांत 8058 धावा केल्या आहेत. आयपीएमध्ये त्याच्या नावावर 5070 धावा आहे. नुकतेच त्याने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 5000 धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरण्याचा विक्रम त्याने केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh Raina completes 6000 runs on Indian Stadiums in T20 Cricket