Suryakumar Yadav applies pitch soil on forehead after India wins T20 World Cup 2026
esakal
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर गारद झाला. या विजयासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच आपल्या घरच्या मैदानावर टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.