ICC Awards 2023 : सूर्याकडे आयसीसीच्या टी-20 संघाचं नेतृत्व; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Suryakumar Yadav
Suryakumar Yadavsakal

सध्या 2024 हे वर्ष सुरू आहे आणि या वर्षी टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे, जो जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मधील टी-20 आंतरराष्ट्रीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या 11 खेळाडूंमध्ये जगभरातील खेळाडूंसोबतच भारतीय संघातील खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला त्याचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Suryakumar Yadav
Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर, BCCI ने दिले कारण

आयसीसीने या संघात ज्या 11 खेळाडूंचा समावेश केला आहे, त्यात पहिले नाव भारताच्या नव्या स्टार यशस्वी जैस्वालचे आहे. जैस्वालला गेल्या वर्षीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. यानंतर तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्यासह इंग्लंडच्या फिल सॉल्टला दुसरा सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे. सॉल्टने गेल्या वर्षी टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली होती.

Suryakumar Yadav
Rohit Sharma : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला रोहितची अनुपस्थितीत; हैदराबादमध्ये पोहचून केला सराव?

वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या निकोलस पूरनला आयसीसी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेल्या 13 डावांपैकी केवळ 3 वेळा त्याला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

भारताच्या सूर्यकुमार यादवची केवळ संघात निवड झाली नाही, तर त्याला या संघाचा कर्णधारही बनवण्यात आले आहे. टी-20 मधील आयसीसी क्रमवारीतही तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. वर्षाच्या अखेरीस त्याला टीम इंडियाच्या कर्णधारपदाचीही संधी मिळाली.

न्यूझीलंडचा मार्क चॅपमन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, युगांडाचा अल्पेश रमाझानी, आयर्लंडचा मार्क अडायर हे संघात आहेत. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईही या संघात आपली जागा निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. या संघात झिम्बाब्वेचा रिचर्ड नगारावा आणि भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील दिसत आहे.

ICC पुरुषांचा T20 वर्षातील सर्वोत्तम संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन, मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नागरवा, अर्शदीप सिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com