

Suryakumar Yadav looks to regain his place in the Indian T20 team through the Syed Mushtaq Ali Trophy
esakal
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला टी-२० विश्वकरंडक विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला सुमार फलंदाजी फॉर्ममुळे टीम इंडियातील स्थान गमवावे लागले. ही निराशा मागे टाकत आता हा पठ्ठ्या सय्यद मुश्ताक अली या राष्ट्रीय टी-२० स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भारताच्या टी-२० संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी सूर्यकुमार यादव प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे. याच कारणामुळे त्याच्या दुसऱ्या इनिंगची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.