Suryakumar Yadav : सेमीफायनल पूर्वी सूर्याने लावला शॉपिंगचा धडाका; कॅप्टन रोहितने केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav : सेमीफायनल पूर्वी सूर्याने लावला शॉपिंगचा धडाका; कॅप्टन रोहितने केला खुलासा

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालत आहे. सूर्याने आतापर्यंत टी-20 विश्वचषकाच्या पाच डावांमध्ये 225 धावा केल्या आहेत. सूर्या जसा वेगवान फलंदाजी करण्यात माहीर आहे, तसाच त्याला खरेदी करण्यातही खूप रस आहे. याचा खुलासा खुद्द संघाचा कर्णधार रोहित शर्माने केला आहे. त्याने सांगितले की, सूर्या त्याची पत्नी देविशा शेट्टीसोबत जोरदार शॉपिंग करत आहे.

हेही वाचा: PAK vs NZ : पाक करणार 1992 च्या इतिहासाची पुनरावृत्ती; न्यूझीलंडविरूद्धच्या सेमी फायनलमध्ये काय घडलं होतं?

सुर्याने आपले प्रेम दाखवण्यासाठी पत्नी देविशा शेट्टीला डेटवर नेले आणि तेथे त्यांनी काही वेळ एकत्र घालवला. याशिवाय अॅडलेडमध्ये त्यांनी देविशासोबत खूप शॉपिंग केली. देविशा ही नेहमीच सूर्याची सपोर्ट सिस्टीम राहिली आहे. देविशाने सूर्याला त्याच्या वाईट काळात नेहमीच साथ दिली आहे.

हेही वाचा: Sanjana Genshan: 'मी सुंदर नाही म्हणतो, तुझा चेहरा चपलेसारखा' बुमराहच्या बायकोचा 'यॉर्कर'

सूर्याने याआधी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, देविशाने नेहमीच त्याला खूप सपोर्ट केला आहे. 2020 मध्ये भारतीय संघात निवड झाली नव्हती तेव्हा देविशाने सूर्याच्या आहारात आणि जीवनशैलीत बरेच बदल केले होते. 2020 मध्ये सूर्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. यानंतरही निवड समितीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. अखेरीस 2021 मध्ये त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले.

सूर्यकुमार यादवसाठी 2022 चा टी-20 विश्वचषक चांगला गेला आहे. आतापर्यंत त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 225 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात त्याचा स्ट्राईक रेट 193.96 आहे आणि त्याची सरासरी 75 आहे.