Suryakumar Yadav : सुर्या वेगळ्या ग्रहावरचा माणूस! पाकिस्तानी खेळाडूंकडून स्तुती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav : सुर्या वेगळ्या ग्रहावरचा माणूस! पाकिस्तानी खेळाडूंकडून स्तुती

Suryakumar Yadav T20 World Cup 2022 : सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा 360 अंशांचा खेळ दाखवत झिम्बाब्वेचा पराभव करण्यात मोठी भूमिका बजावली. सूर्यकुमारने अवघ्या 24 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या. सूर्यकुमारच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताला शेवटच्या 5 षटकांत 79 धावा करता आल्या.

हेही वाचा: T20 WC : जुना खेळाडू बनला दक्षिण आफ्रिकेचा दुश्मन! विश्व कप मधून काढले बाहेर

सूर्यकुमारच्या डावातील सर्वात अविश्वसनीय शॉट्सपैकी एक म्हणजे फाइन लेगवर मारलेला स्कूप शॉट होता. सामन्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने सूर्याचे कौतुक केले आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो की गोलंदाजांना चेंडू कुठे फेकायचा, पर्यायच उरला नाही. शेवटी, गोलंदाज गेला तर कुठे जायचे. पाकिस्तानच्या ए स्पोर्ट्स चॅनलवर बोलताना अक्रम म्हणाला की तो सुर्या वेगळ्या ग्रहावरचा आहे.

हेही वाचा: Rahul Dravid : उपांत्य फेरीत भारतीय संघात बदल होणार, राहुल द्रविडने केली पुष्टी

अक्रम म्हणाला, मला वाटते की तो वेगळ्या ग्रहावरून आला आहे. तो इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याने धावा केवळ झिम्बाब्वेविरुद्धच नव्हे, तर जगातील अव्वल गोलंदाजी आक्रमणांविरुद्ध धावा केल्या आहेत आणि ते पाहण्यासारखे आहे. अक्रमच्या वक्तव्यानंतर वकार युनूस म्हणाला, गोलंदाज गेला तर कुठे जाईल? अशा फलंदाजाविरुद्ध नियोजन करणे कठीण आहे. तुम्ही सूर्यकुमारविरुद्ध टी-20 मध्ये प्लॅनिंग करू शकत नाही. तुम्ही एकदिवसीय किंवा कसोटी सामन्यात त्याच्याविरुद्ध या योजना करू शकता. सूर्याला टी-20 मध्ये बाद करणे गोलंदाजांसाठी कठीण झाले आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कपनंतर 'हिटमॅन'ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार का?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 9 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे होणार आहे. त्याचवेळी, दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाईल. यानंतर 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये अंतिम सामना होणार आहे.