Sakal-Society-League
Sakal-Society-League

SCL 2019 : सुवन क्रेस्टा संघाने पटकावले विजेतेपद 

पुणे : सकाळ माध्यम आणि व्हीटीपी रिऍलिटी प्रस्तूत पहिल्या सोसायटी क्रिकेट लीगमध्ये रोमांचकारक आणि नाट्यमय घटनांनंतर सुवन क्रेस्टा संघाने विजेतेपद मिळविले. निर्धारित सहा षटके आणि सुपर ओव्हरमधील "टाय'नाट्यानंतर नियमानुसार सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. संपूर्ण स्पर्धेसह अंतिम सामन्यातही जिगरबाज खेळ करणाऱ्या गगन गॅलेक्‍सी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाने हर्षल देसाई (नाबाद 34) याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर 3 बाद 82 धावांची मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करताना गगन गॅलेक्‍सीने सर्वोत्तम खेळाचे प्रयत्न केले. अखेरच्या षटकांत त्यांना विजयासाठी 15 धावांची आवश्‍यकता असताना अमित ठक्कर याने त्या धावा केल्या देखील, मात्र अखेरच्या चेंडूवर तो बाद झाल्याने सामना बरोबरीत राहिला. 

त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गगन गॅलेक्‍सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 12 धावा केल्या. आव्हान सोपे असले, तरी सुवन क्रेस्टाची मजलदेखील 12 धावांवरच थांबली. निर्धारित षटक आणि सुपर ओव्हरमध्येही निकाल लागू न शकल्यामुळे सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याच्या नियमाचा वापर करण्यात आला. या नियमानुसार सुवन क्रेस्टा विजयी ठरले. 

संक्षिप्त धावफलक : 
अंतिम फेरी 
सुवन क्रेस्टा, बिबवेवाडी : 6 षटकांत 3 बाद 82 (हर्षद देसाई नाबाद 34-13 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, अमित ठक्कर 1-16) बरोबरी विरुद्ध गगन गॅलेक्‍सी, बिबवेवाडी : 6 षटकांत 2 बाद 82 (अमित ठक्कर 43-21 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, देवेंद्र देसाई 2-16 
सुपर ओव्हर 
गगन गॅलेक्‍सी, बिबवेवाडी : 1 षटकात 12 (टिंकेश पाटील नाबाद 5, रितेश अगरवाल नाबाद 3, देवेंद्र देसाई 1-8) बरोबरी विरुद्ध सुवन क्रेस्टा, बिबवेवाडी : 1 षटकांत 12 (देवेंद्र देसाई नाबाद 8, हर्षद देसाई नाबाद 2, स्वराज नांदुसकर 0-12) 
सामनावीर : अमित ठक्कर 
स्पर्धा नियमानुसार सर्वाधिक चौकार, षटकार मारणारा सुवन क्रेस्टा संघ विजयी घोषित. 

उपांत्य फेरी 
राधिका, सिंहगड रोड : 6 षटकांत 5 बाद 43 (विराज पानसरे 24, विरल मेहता 2-6) पराभूत विरुद्ध गगन गॅलेक्‍सी, बिबवेवाडी : 3 षटकांत बिनबाद 44 (रितेश अगरवाल नाबाद 21) 
सामनावीर : विरल मेहता 

अरिहंत प्रथमेश, कोंढवा : 6 षटकांत 3 बाद 73 (योगेश झेंडे 27, देवेंद्र देसाई 2-19) पराभूत विरुद्ध सुवन क्रेस्टा, बिबवेवाडी : 5.5 षटकांत 6 बाद 74 (अमित मारणे 24, प्रदीप पवार 2-15) 
सामनावीर : देवेंद्र देसाई 

उपांत्यपूर्व फेरी 
गगन गॅलेक्‍सी, बिबवेवाडी : 6 षटकांत 5 बाद 71 (अमित ठक्कर 29-14 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, आनंद देशपांडे 2-13) विजयी विरुद्ध उन्नती, कोंढवा बुद्रुक : 6 षटकांत सर्व बाद 43 (अविनाश रोहिडा 11, अमित ठक्कर 4-7) 
सामनावीर : अमित ठक्कर 

श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी, नऱ्हे : 6 षटकांत 6 बाद 96 (अमेय हुजारे 36-12 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, देवेंद्र देसाई 2-23) पराभूत विरुद्ध सुवन क्रेस्टा, बिबवेवाडी : 5.2 षटकांत 2 बाद 100 (देवेंद्र देसाई 69-17 चेंडू, 3 चौकार, 7 षटकार, असिफ अकिवाते1-19) 
सामनावीर : देवेंद्र देसाई 

नव अजंठा ऍव्हेन्यू, कोथरूड : 5.3 षटकांत सर्व बाद 43 (अनिमेशन दराडे 12, अतुल धुमाळ 3-17) पराभूत विरुद्ध राधिका, सिंहगड रोड : 4.4 षटकांत 1 बाद 44 (विराज पानसरे नाबाद 24-15 चेंडू, 1 चौकार, अन्वय अगटे 1-24) 
सामनावीर : अतुल धुमाळ 

अरिहंत प्रथमेश, कोंढवा : 6 षटकांत 2 बाद 103 (योगेश झेंडे नाबाद 35-13 चेंडू ,2 चौकार, 3 षटकार, रमेश राठोड 1-15) विजयी विरुद्ध विजयनगर, धायरी : 5.2 षटकांत सर्व बाद 67 (प्रमोद मागाडे 42-16 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, प्रदीप पवार 3-15, योगेश झेंडे 1-12) 
सामनावीर : योगेश झेंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com