ISSF World Cup : नेमबाज स्वप्निल कुसळे, आशी चौकसीचा 'सुवर्णवेध'

Swapnil Kusale Ashi Chouksey Won  gold medal in ISSF World Cup Baku Azerbaijan
Swapnil Kusale Ashi Chouksey Won gold medal in ISSF World Cup Baku Azerbaijanesakal

नवी दिल्ली : भारताचे नेमबाज स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) आणि आशी चौकसी (Ashi Chouksey) यांनी आयएसएसएफ वर्ल्ड कपची (ISSF World Cup) सांगता सुवर्णपदकाने (Gold Medal) केली. अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वप्निल आणि आशीने मीटर रायफल थ्री पोजिशनच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.

Swapnil Kusale Ashi Chouksey Won  gold medal in ISSF World Cup Baku Azerbaijan
फेंच ओपनमध्ये व्यत्यय; आपल्याकडे फक्त 1028 दिवस उरलेत...

स्वप्निल आणि आशी या भारतीय जोडीने युक्रेनच्या सेरही कुलिश आणि दारिया टायकोवाचा 16 - 12 अशा गुणफरकाने पराभव केला. भारताने वर्ल्ड कपमध्ये आपले दुसरे सवर्ण पदक पटकावले. यापूर्वी एल्वेनिल वेलारिवन, श्रेया अगरवाल आणि रमिता यांनी 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

Swapnil Kusale Ashi Chouksey Won  gold medal in ISSF World Cup Baku Azerbaijan
तू 50 टक्के जरी वडिलांसारखा झालास तर... अर्जुनबाबत कपिल देव यांचे वक्तव्य

भारतीय नेमबाजांनी दोन सुवर्णासह तीन रौप्य पदकांची देखील कमाई केली. याचबरोबर भारताने पदक तालिकेत कोरियानंतर दुसरे स्थान पटकावले. स्वप्निलने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विशेष कामगिरी केली आहे. त्याचे हे स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक होते. याचबोरबर त्याने बाकू येथील वर्ल्डकपमध्ये तिसरे पदक पटकावले. त्याने यापूर्वी पुरूष थ्री पोजिशन वैयक्तिक आणि पुरूष सांघिक स्पर्धेत दोन रौप्य पदकांची देखील कमाई केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com