ढाब्यावर फरशी पुसणारी युवती खेळणार आशियाई स्पर्धेत

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मनाली : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खेळाडू कसे आपले स्वप्न करू शकतो, याचे जिवंत उदाहरण हिमाचल प्रदेशात पाहायला मिळाले आहे. धाब्यावर फरशी पुसण्याचे काम करणाऱ्या कविता ठाकूर या युवतीची आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. त्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

मनालीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या जगतसुख गावातील एका ढाब्यावर 24 वर्षीय कविता फरशी पुसण्याचे काम करते. कविताच्या कुटुंबीयांकडूनच हा ढाबा चालविला जातो. कविताने 2014 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकून देण्यातही तिचा वाटा होता. कविताचे वडिल पृथ्वी सिंह आणि कृष्णा देवी अजूनही ढाबा चालवितात आणि कविताची छोटी बहिण कल्पना त्यांना मदत करते.

कविताने याविषयी बोलताना म्हटले आहे, की ढाब्यावर मी माझ्या कुटुंबीयांसोबत अजूनही काम करते. याठिकाणी मी प्लेट धुण्याचे, फरशी पुसण्याचे आणि इतरही काम करते. माझे लहानपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले आहे. हिवाळ्यात ढाब्यावर अक्षरशः बर्फ साचत असे. तेव्हाही मला काम करावे लागत असे. तेव्हा माझ्याकडे पैसेही नसत आणि मी भूकेने व्याकूळ असायचे. 2014 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघात माझा समावेश असल्याने मला सरकारकडून मदत मिळाली. त्यानंतर मी कुटुंबीयांसह मनालीजवळ घर घेऊ शकले. मी कुटुंबीयांना घर मिळवून देऊ शकले ही माझ्या आय़ुष्यातील सर्वांत आनंदाची गोष्ट होती. 

Web Title: From sweeping a dhaba floor to playing for gold at Asiad