NED vs SL : 48 वर्षात जे घडलं नाही ते नेदरलँडच्या फलंदाजांनी करून दाखवलं; ऑरेंज आर्मी अजून एक धक्का देणार?

NED vs SL World Cup 2023
NED vs SL World Cup 2023 esakal

NED vs SL World Cup 2023 : भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर नेदरलँड अजून कोणाला धक्का देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात नेदरलँडने 6 बाद 91 धावांवरून 263 धावांपर्यंत मजल मारली.

सायब्रंड एंजलब्रेज्ट आणि वॅन बीक यांनी 48 वर्षात वर्ल्डकप इतिहासात जे घडलं नाही ते करून दाखवलं. त्यांनी सातव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी रचली. ही वर्ल्डकपमधील सातव्या विकेटसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे.

NED vs SL World Cup 2023
Team India : 'शार्दुल ठाकुर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार...' कर्णधार रोहितचा मोठा खुलासा

दरम्यान, आज लखनौच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. आफ्रिकेला रडवणारी नेदरलँड लंकेला देखील जेरीस आणेल असे वाटत होते. नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला होता. मात्र लंकेने त्यांची अवस्था 6 बाद 91 अशी केली. त्यामुळे आफ्रिका विजय हा नेदरलँडसाठी चमत्कारच होता की काय असे वाटून गेले.

मात्र सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सायब्रंड एंजलब्रेज्ट आणि वॅन बीक यांनी अर्धशतकी खेळी करत नेदरलँडला 263 धावांपर्यंत मजल मारून दिली. सायब्रंडने 82 चेंडूत 70 धावा केल्या तर बीकने 75 चेंडूत 59 धावांची खेळी केली.

या दोघांबरोबरच नेदरलँडकडून एकरमनने 29 तर मॅक्स आणि कर्मधार एडवर्डने प्रत्येकी 16 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून मदुशंका आणि रजिता यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

NED vs SL World Cup 2023
Waqar Younis : मी तर अर्धा ऑसी... वकारला पाकिस्तानी म्हणवून घेण्याची वाटते लाज?

नेदरलँडच्या 263 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात देखील खराब झाली. आर्यन दत्त आणि कुलस परेरा (5) आणि कुसल मेंडिस (11) यांना बाद केलं. मात्र यानंतर पथुम निसंका आणि सदीरा समरविक्रमाने डाव सावरत श्रीलंकेला 13 षटकात 70 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com