Syed Mushtaq Ali Trophy, KARvsVID : कदम- पांड्येचा अर्धशतकी तडका; विदर्भासमोर ठेवलं मोठ लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohan Kadam and Manish Pandey
कदम- पांड्येचा अर्धशतकी तडका; विदर्भासमोर ठेवलं मोठ लक्ष्य

कदम- पांड्येचा अर्धशतकी तडका; विदर्भासमोर ठेवलं मोठ लक्ष्य

Syed Mushtaq Ali Trophy Semi Final 2 KARvsVID, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी लढत रंगली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकने विदर्भासमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कर्नाटकचा सलामीवीर रोशन कदम आणि कर्णधार मनिष पांड्ये या जोडीनं संघाच्या डावाला दमदार सुरुवात करुन दिली.

हेही वाचा: Video : भुवीनं तोडली नीशमची बॅट; साउदी-बोल्ट झाले आवाक

पहिल्या विकेटसाठी या जोडीने 91 चेंडूत 132 धावांची भागीदारी रचली. रोशन कदमच्या रुपात कर्नाटकला पहिला धक्का बसला. त्याने 56 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 87 धावांची जबरदस्त खेळी केली. मनिष पांड्ये 42 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 54 धावा करुन माघारी फिरला. या दोघांची विकेट ललित यादवलाच मिळाली. अविनाश मनोहरने 13 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 27 धावा कुटल्या. या तिघांच्या लक्षवेधी खेळीच्या जोरावर कर्नाटकने निर्धारित 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या आहेत.

हेही वाचा: साक्षी-धोनी सेलिब्रेशन मूड; छोटा माही लवकरच येणार?

विदर्भाकडून दर्शन नलकांडे याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 28 धावा खर्च केल्या. त्याच्याशिवाय ललित यादवला 2 तर यश ठाकूरला 1 गडी बाद करण्यात यश आले. पहिल्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूच्या संघाने हैदराबादला पराभूत करत फायनल गाठली आहे. या सामन्यातील विजेता फायनलमध्ये तामिळनाडूविरुद्ध देशांतर्गत स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या ट्रॉफीसाठील लढणार आहे.

loading image
go to top