SMAT 2022 : ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राच्या विजयाची हॅट्‌ट्रिक

मुश्‍ताक अली टी-२० : ॠतुराजची पुन्हा शतकी खेळी
syed mushtaq ali trophy 2022 ruturaj gaikwad
syed mushtaq ali trophy 2022 ruturaj gaikwadsakal

Syed Mushtaq Ali Trophy 2022 : महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने मंगळवारी सय्यद मुश्‍ताक अली टी-२० करंडकातील विजयाची हॅट्‌ट्रिक साजरी केली. कर्णधार ॠतुराज गायकवाडच्या ११४ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने केरळवर ४० धावांनी विजय संपादन केला. कर्नाटक व सर्व्हिसेस यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर महाराष्ट्राने जम्मू-काश्‍मीर, मेघालय व आता केरळला हरवण्याची किमया साधली आहे.

syed mushtaq ali trophy 2022 ruturaj gaikwad
T20 World Cup : टीम इंडियाचा आज न्यूझीलंडविरुद्ध सामना; कुठे पाहू शकता, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारन ॠतुराज गायकवाड याने या स्पर्धेतील आपला शानदार फॉर्म या लढतीत कायम ठेवला. त्याने अवघ्या ६८ चेंडूंमध्ये ८ नेत्रदीपक चौकार व ७ गगनभेदी षटकारांसह ११४ धावांची शतकी खेळी साकारली.

syed mushtaq ali trophy 2022 ruturaj gaikwad
T20 World Cup : श्रीलंकेचे आव्हान कायम, अमिरातीचा उडवला धुव्वा

संक्षिप्त धावफलक :

महाराष्ट्र - २० षटकांत ४ बाद १६७ धावा (ॠतुराज गायकवाड ११४ - ६८ चेंडू, ८ चौकार, ७ षटकार, पवन शाह ३१, अझीम काझी १४, सिझोमोन जोसेफ ३/१८) विजयी वि. केरळ २० षटकांत ८ बाद १२७ धावा (रोहन कुन्नूमल ५८, सिझोमोन जोसेफ १८, सत्यजीत बच्छाव ३/११, अझीम काझी २/२५).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com