T20 India Squad : रोहित होणार टी 20 चा कर्णधार मात्र विराटचा पत्ता कट?

T20 India Squad
T20 India Squad esakal

T20 India Squad : बीसीसीआय आज (दि. 06) अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. काल शुक्रवारी टी 20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. ही स्पर्धा युएसएमध्ये 1 जून पासून सुरू होणार आहे.

दरम्यान, टी 20 वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तान विरूद्धची मालिका खेळेल. त्यानंतर आयपीएल आणि थेट वर्ल्डकप सुरू होईल. अफगाणिस्तान मालिकेला कर्णधार हार्दिक पांड्या मुकणार आहे. त्यामुळे भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडे सोपवले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपनंतर एकही आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळलेला नाही.

T20 India Squad
David Warner : गेल्या दोन वर्षापासून ऑस्ट्रेलिया संघाने... डेव्हिड वॉर्नर निवृत्तीनंतर काय म्हणाला?

रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारतीय संघाचं नेतृत्व करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर विराट कोहलीचा मात्र टी 20 वर्ल्डकपसाठी विचार केला जाणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजून याबाबतची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन कसोटीदरम्यान, भारतीय निवडसिमतीचे सदस्य विराट कोहली, रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर काल निवडसमितीची बैठक देखील झाल्याचं बोललं जात आहे.

यावेळी अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी आणि इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवडीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

T20 India Squad
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईट वॉश; तिसऱ्या कसोटीत 8 विकेट्सनी दिली मात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com