esakal | T20 World Cup: सबा करीम म्हणतात, 'या' दोघांची संघाला गरज नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan

T20 World Cup: सबा करीम म्हणतात, 'या' दोघांची संघाला गरज नाही!

sakal_logo
By
विराज भागवत

विश्वचषकासाठी स्वत:च्या पसंतीचा टी२० संघ केला जाहीर

T20 World Cup 2021: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी २० विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेसाठी १० सप्टेंबरपर्यंत संघाची घोषणा करण्याची मुदत देण्यात आली आहे. सर्व संघांना १५ खेळाडूंचा चमू शुक्रवारपर्यंत जाहीर करावा लागणार आहे. या संघासाठी अनेक क्रिकेट जाणकार आपापली मते प्रदर्शित करत आहेत. तशातच माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनीही आपल्या पसंतीची १५ जणांची टीम सांगितली असून त्यातून धवन आणि चहल यांना संघाबाहेर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: गावसकरांनी निवडला T20 WC चा संघ; धवन, श्रेयसला डावलले

"आपण कोणत्याही मोठ्या स्पर्धेसाठी संघ निवडताना सध्या सुरू असलेल्या स्पर्धेचा किंवा मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीचा आधार घेतो. पण तसं करण्यापेक्षा इंग्लंडविरूद्ध भारतात झालेल्या टी२० मालिकेतील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. त्यानुसार बोलायचं झालं तर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर या तीन वेगवान गोलंदाजांचा अनुभव कामी येईल. त्यांच्यासोबत टी नटराजनसारखा एखादा डावखुरा वेगवान गोलंदाजही असायलाच हवा", असे करीम म्हणाले.

हेही वाचा: T20 WC squad : कुणाला मिळणार संधी? कोण आहे दावेदार, जाणून घ्या

"गोलंदाजीत फिरकीपटू म्हणून मला वाटतं की राहुल चहर हा युझवेंद्र चहलपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. तो उत्तम गोलंदाज तर आहेच. त्यासोबत चांगला फिल्डरही आहे. आणि जर वॉशिंग्टन सुंदर फिट नसेल तर वरूण चक्रवर्तीच्या नावाचा विचार नक्कीच व्हायला हवा. तसेच, शिखर धवनपेक्षा नव्या दमाच्या काही खेळाडूंची फलंदाजी सध्या चांगल्या लयीत दिसून आली आहे. त्यामुळे संघात त्यांना संधी मिळायला हवी", असेही सबा करीम यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: T20 WC टीम सिलेक्शननंतर तासाभरात कोचचा राजीनामा

दरम्यान, T20 World Cup 2021 स्पर्धेत टीम इंडियाचा सलामीचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. २४ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर भारताचा ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी, ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी तर पुढील दोन सामने ५ आणि ८ नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये कोणाकोणाला स्थान मिळणार, याचा निर्णय आज होणार आहे.

loading image
go to top