ऑस्ट्रेलियात T20 World Cup ला मोठ्या उत्साहाने सुरुवात, जाणून घ्या सामने कुठे अन् कसे पहायचे

टी-20 वर्ल्ड कप चा थरार आजपासून ऑस्ट्रेलियात रंगणार आहे.
T20 World Cup Live Streaming
T20 World Cup Live Streaming

T20 World Cup Live Streaming : आठव्या टी-20 वर्ल्ड कप चा थरार आजपासून ऑस्ट्रेलियात रंगणार आहे. यादरम्यान 29 दिवसांत एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. 16 संघ ट्रॉफीसाठी मैदानात उतरतील. सुपर-12 मध्ये आठ संघांना सरळ स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर आठ संघ पहिल्या फेरीत खेळतील. तेथे चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहेचार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील टॉप 2 संघ सुपर-12 मध्ये प्रवेश करतील.

T20 World Cup Live Streaming
आजपासून ऑस्ट्रेलियात T20 World Cup, पहिल्या फेरीत आशिया चॅम्पियन श्रीलंकेवर नजर

भारतीय संघ 15 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 2007 मध्ये पहिल्या विश्वचषकात भारतीय संघ चॅम्पियन बनली होती. यंदाच्या हंगामात त्यांचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. 16 ऑक्टोबरपासून पहिल्या फेरीचे सामने खेळवले जातील. त्याचवेळी 22 ऑक्टोबरला सुपर-12 सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी 16 ऑक्टोबरला श्रीलंकेचा सामना नामिबियाशी होईल आणि यूएईचा सामना नेदरलँडशी होणार आहे.

T20 World Cup Live Streaming
Sourav Ganguly : BCCI च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर दादाचा पुढचा 'प्लॅन' तयार
  • 16 ऑक्टोबर रोजी कोणत्या संघांमध्ये सामना होणार आहे?

    T20 विश्वचषकाचा पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात होणार आहे. दुसरा सामना UAE आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे.

  • दोन्ही सामने किती वाजता सुरू होतील?

    श्रीलंका आणि नामिबिया यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याच वेळी यूएई आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होईल.

  • टीव्हीवर सामना कुठे पाहू शकतो?

    T20 विश्वचषकाचे सर्व सामने भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील.

  • कोणत्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन केले जाईल?

    सर्व T20 विश्वचषक सामने Disney+Hotstar वर ऑनलाइन पाहता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com