T20 World Cup 2022 : ICC तिकीट विक्रीचा आकडा 5 लाख पार; भारत-पाकिस्तान मिनिटात 'हाऊस फुल'!

T20 World Cup 2022 India Vs Pakistan High Voltage Match At MCG All Tickets Sold
T20 World Cup 2022 India Vs Pakistan High Voltage Match At MCG All Tickets Sold esakal

T20 World Cup 2022 India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भिडणार आहेत. हा हाय व्होल्टेज सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. दरम्यान, आज आयसीसीने या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे अतिरिक्त स्टँडिंग रूम तिकिट देखील काही मिनिटातच संपल्याचे आयसीसीने सांगितले. आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी जवळपास 5 लाखाच्या वर तिकिटे विकली असल्याचे सांगितले.

T20 World Cup 2022 India Vs Pakistan High Voltage Match At MCG All Tickets Sold
Shoaib Akhtar Virat Kohli Retire : भाऊ तू निवृत्ती घे! आफ्रिदीनंतर पाकचा अख्तरही बरळला!

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'आयसीसी पुरूषांच्या टी 20 वर्ल्डकप 2022 साठी सर्व वयोगट आणि पार्श्वभूमीच्या चाहत्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. आम्ही या स्पर्धेसाठी अजून एक महिना शिल्लक असताना देखील जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत.'

आयसीसी पुढे म्हणते, '82 देशातील चाहत्यांनी टी 20 क्रिकेट वर्ल्डकपचा आस्वाद घेण्यासाठी तिकिटे खरेदी केली आहेत. या स्पर्धेत 16 आंतरराष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत. 2020 ला झालेल्या महिला टी 20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये स्टेडियमच्या पूर्ण क्षमतेने प्रेक्षक उपस्थित असणार आहेत. एमसीजीवर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी जवळपास 86 हजार 174 प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. '

भारत पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसी म्हणते, '23 ऑक्टोबरला एमसीजीवर होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याची देखील सगळी तिकिटे विकली गेली आहे. अतिरिक्त स्टँडिंग रूम तिकीट देखील काही मिनिटात संपली. सामन्याच्या आधी काही दिवस अधिकृत तिकीट पुनःविक्री सुविधा देखील सुरू करण्यात येणार आहे, जेथे चाहते आपले तिकीट विकू शकतील.'

T20 World Cup 2022 India Vs Pakistan High Voltage Match At MCG All Tickets Sold
Yuzvendra Chahal : मस्त चाललंय आमचं! चहलने रोमँटिक VIDEO शेअर करत ...

दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश याचबरोबर भारत आणि ग्रुप A मधील उपविजेता सामन्यांच्या तिकिटे संपली आहेत. असे असले तरी अतिरिक्त तिकिटे देखील लवकरच उपलब्ध होणार आहेत. आयसीसीने सांगितले की, 'सुपर 12 मधील ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या सामन्याची थोडीच तिकिटे शिल्लक आहेत. याचबरोबर पाकिस्तान विरूद्ध ग्रुप A उपविजेता. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांची देखील थोडीच तिकिटे शिल्लक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com