Ind vs Pak: भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ शिगेला, 3 महिन्यांपूर्वीच सर्व तिकीट बुक : T20 World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Pakistan T20 world cup 2022

Ind vs Pak: भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ शिगेला, 3 महिन्यांपूर्वीच सर्व तिकीट बुक

India vs Pakistan T20 world cup 2022: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला आता अवघे काही महिने उरले आहेत. ही स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यावेळीही भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. मात्र याच्या जवळपास सर्व तिकिटे तीन महिन्यांआधीच विकल्या गेली आहेत. आजपासूनच हा सामना हाऊसफुल्ल झाला आहे. टुरिझम ऑस्ट्रेलियाकडून ही माहिती समोर आली आहे.(ind vs pak Match tickets sold out in few minutes)

हेही वाचा: Shahid Afridi : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या विजयावर आफ्रीदीचं मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची मागणी सर्वाधिक आहे. याआधी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. आशिया चषक यावेळी श्रीलंकेत खेळवला जाणार आहे, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

ग्लोबल स्पोर्ट्स ट्रॅव्हल कंपनीच्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 40% पॅकेजेस खरेदी करण्यात आल्या आहेत. 27% पॅकेजेस उत्तर अमेरिकेत, 18% ऑस्ट्रेलियात आणि 15% इंग्लंडसह इतर देशांमध्ये खरेदी करण्यात आली आहे. मेलबर्नमधील हॉटेलच्या खोल्या आधीच बूक केल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मेलबर्नमध्ये 45 ते 50 हजार चाहते बाहेरून येणार आहेत.

Web Title: T20 World Cup 2022 India Vs Pakistan Match Tickets Sold Out In Few Minutes Ind Vs Pak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..