T20 WC 2022 : रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँड्सने UAE चा केला पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC T20 World Cup UAE vs NED

T20 WC 2022 : रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँड्सने UAE चा केला पराभव

ICC T20 World Cup UAE vs NED : आयसीसी टी-20 विश्वचषकाला धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन जोरदार सामने पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नामिबियाविरुद्ध दारूण पराभव झाला, तर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात नेदरलँड्सने यूएईचा पराभव केला. बास डेलिडेच्या घातक गोलंदाजीसमोर यूएईचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 111 धावांपर्यंत मजल मारू शकला. नेदरलँड्सने ही धावसंख्या 19.5 षटकांत 7 गडी गमावून पूर्ण केली. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 16 धावांची नाबाद खेळी खेळली.

हेही वाचा: T20 World Cup : आशिया चॅम्पियन श्रीलंकेला नामिबियाने दिवसा दाखवले तारे

गिलॉन्गच्या सिमंड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने यूएईचा 3 गडी राखून पराभव केला. दोघांमधील हा सामना खूपच रोमांचक झाला. शेवटच्या षटकात सामन्याचा निर्णय लागला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या UAE संघाला 20 षटकात 111 धावा करता आल्या. यूएईकडून मोहम्मद वसीमने 41 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकला नाही. नेदरलँड्सकडून बास डी लीने 3 बळी घेतले.

हेही वाचा: T20 World Cup : लाइव्ह मॅचमध्ये बॅट्समन पडला तोंडावर, व्हिडिओ व्हायरल

112 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडलाही हे लक्ष्य गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. नेदरलँड्सने हे लक्ष्य सामन्याच्या शेवटच्या षटकात गाठले. नेदरलँड्सकडून मॅक्सोडने 23 धावा केल्या, तर शेवटी कर्णधार स्कॉट एडवर्डने 16 धावांची मौल्यवान खेळी केली. त्याने सामन्याच्या टर्निंग पॉइंटवर टीम पिंगलसोबत 27 धावांची भागीदारी केली आणि सामना नेदरलँड्सच्या दिशेने नेला. दुसरीकडे जुनैद सिद्दीकीने यूएईकडून शानदार गोलंदाजी करताना 3 बळी घेतले.