Pakistan Vs England : पाकिस्तान, इंग्लंड जास्त नाचू नका; बॅटिंग फक्त वरूण राजाच करणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain In Pakistan Vs England T20 world Cup 2022 Final

Pakistan Vs England : पाकिस्तान, इंग्लंड जास्त नाचू नका; बॅटिंग फक्त वरूण राजाच करणार!

Rain In Pakistan Vs England T20 world Cup 2022 Final : इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सनी पराभव करत टी 20 वर्ल्डकपची सेमी फायनल जिंकली. याचबरोबर आता भारत विरूद्ध पाकिस्तान ही ड्रीम फायनल होणार नाही म्हटल्यावर एमसीजीवरील तिकीट विक्रीवरही परिणाम झाला आहे. तसेच चाहत्यांच्या मनात जरी पाकिस्तान आणि इंग्लंड फायलन सामना होईल की नाही याबाबतच शंका निर्माण झाली आहे. वरूण राजनं तशी खेळी करण्याचे संकेतच दिले आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2022: पराभवानंतर पाकच्या पंतप्रधानांकडून टीम इंडियाची क्रूर थट्टा!

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीत अनेक सामने पावसामुळे रद्द करावे लागले होते. दरम्यान, पावसाची शक्यता पाहता आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही सेमी फायनलसाठी 10 आणि 11 हे दिवस राखीव ठेवण्यात आले होते. मात्र सेमी फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला नाही. मात्र आता 13 नोव्हेंबरला होणाऱ्या पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड फायनल सामन्यात पाऊस आपली तुफानी खेळी खेळण्याच्या तयारी आहे. आयसीसीने फायनलसाठी देखील एक दिवस (14 नोव्हेंबर) राखीव ठेवला आहे. नियमानुसार पावसामुळे जर खेळ बाधित झाल तर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे निकाल देण्यासाठी दुसऱ्या डावाची किमान 5 षटके होणे गरजेचे आहे.

मात्र टी 20 वर्ल्डकप फायनलच्या दोन्ही दिवशी जोरदार पाऊस कोसळणार असून यामुळे दोन्ही दिवशी सामना होण्याची शक्यता फार कठिण वाटत आहे. मेलबर्नमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनसुरा मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता 94 टक्के आहे. त्यामुळे अतिम सामना वॉश आऊट होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

हेही वाचा: T20 World Cup : टीम इंडियाचा पराभव, ICC ला दणका! अंतिम सामन्याच्या तिकिटांच्या दरात घसरण

फायनल ही दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. जर पावसाचा व्यत्यय आला तर पुढे दोन तास सामन्याचा कालावधी वाढवला जाईल. याचबरोबर जर त्यादिवशी सामना झालाच नाही तर 14 नोव्हेंबरला एक अतिरिक्त दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र या दिवशी देखील हवामान विभागानुसार 84 टक्के पाऊस सांगितला आहे. त्यामुळे जर दोन्ही दिवशी पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर विजेतेपदाची ट्रॉफी दोघांमध्ये विभागून देण्यात येईल.