IND vs SA T20WC : भारत-आफ्रिका सामन्यातही पाऊस व्हिलन! जाणून घ्या हवामान अंदाज

पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला पायदळी तुडवण्यासाठी उतरणार आहे
IND vs SA T20WC
IND vs SA T20WCsakal

IND vs SA T20 World Cup 2022 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषकातील 30 वा सामना उद्या पर्थ मध्ये रंगणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला पायदळी तुडवण्यासाठी उतरणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने मागील सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे . झिम्बाब्वेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाहून गेला होता.

गुणतालिकेत दोन्ही संघांचे स्थान पाहता भारत दोन सामन्यांत चार गुणांसह गट-2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

IND vs SA T20WC
VIDEO : झिम्बाब्वे विरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर शादाब खान ढसाढसा रडला

पर्थमध्ये संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होणार आहे. त्यावेळी भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळ साडे चार वाजता सुरू होईल. Weather.com नुसार, रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही. रात्री नऊनंतर दोन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पर्थमधील तापमान 13 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दोन्ही संघ कडाक्याच्या थंडीत सामने खेळतील.

IND vs SA T20WC
T20WC : नेदरलँडविरुद्ध विजयानंतर सूर्याने व्यक्त केल्या भावना, 'विराट कोहलीने...'

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, दीपक हुडा.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, तबरेझ शम्सी, रीझा हेंड्रिक्स, मार्को हेंड्रिक्स, मार्को यानसेन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com