t20 world cup 2022 point table group 1
t20 world cup 2022 point table group 1 sakal

T20WC : ऑस्ट्रेलियात पावसाचा कहर! दोन्ही सामने गेले वाहून, गट-1 मध्ये कसे आहे गणित

विश्‍वकरंडकामध्ये शुक्रवार ठरला पाऊसवार! मेलबर्नमधील दोन्ही सामन्यांना फटका

T20 World Cup 2022 : ग्लोबल वॉर्मिंगचा फटका भूतलावर सर्वांनाच बसत आहे. मग त्यातून ट्वेंन्टी-२० क्रिकेट अपवाद कसे ठरेल? ऑस्ट्रेलियात पावसाळा संपत आलेला आहे; परंतु तो घरातून बाहेर पडायला तयार नाही. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेला फटका बसत आहे. शुक्रवारचे तर दोन सामने रद्द करावे लागले.

भारतात पावसाळा संपला असला तरी पुण्यासारख्या शहरांमध्ये त्याने नुकताच हाहाकार माजवला होता. आता वर्ल्डकप क्रिकेटमध्येही त्याने पिच्छा पुरवला आहे. त्यामुळे शुक्रवारी नियोजित असलेल्या आयर्लंड-अाफगाणिस्तान आणि इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या सामन्यांसाठी खेळाडूंना नाणेफेकीलाही मैदानात येण्याची संधी पावसाने दिली नाही. परिणामी संघाची गणिते बिघडली आहेत.

 
t20 world cup 2022 point table group 1
T20 WC : पाकिस्तानच्या भविष्यावर BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

भारत-पाकिस्तान सामना झाला त्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर आजचे हे दोन्ही सामने होते, वास्तविक भारत-पाक सामन्याच्या वेळीही पावसाचा अंदाज होता; परंतु एक दिवस अगोदर सुरू झालेल्या वाऱ्याने पावसाचे ढग दूर नेले, पण शुक्रवारी मात्र तसे काही घडले नाही. मुक्कामी असलेल्या पावसाळी ढगांनी विश्‍वकरंडकातील आजच्या सामन्यांचा बेरंग केला.

कसे आहे गणित

ऑस्ट्रेलियाचे आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्धचे सामने शिल्लक आहेत. या सामन्यात मोठ्या फरकाने ते जिंकू शकतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांचे सात गुण होऊ शकतील. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचे इंग्लंड, आयर्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध सामने आहेत, तर इंग्लंड न्यूझीलंडशी खेळल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध लढणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना इंग्लंडने गमावला तर त्यांचा मार्ग कठीण होईल. या जर-तरच्या गणितात श्रीलंकेने पुढचे सर्व सामने जिंकले तर तेही शर्यतीत कायम राहातील.

 
t20 world cup 2022 point table group 1
Sourav Ganguly : BCCI च्या ऐतिहासिक घोषणेनंतर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया; वाचा कोणाला दिले श्रेय

ऑस्ट्रेलियाला जीवदान

अतिशय चुरशीच्या ‘अ’ गटात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी शुक्रवारची लढत अत्यंत महत्त्वाची होती. पराभूत होणारा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद होण्याची शक्यता वाढणार होती; परंतु पावसामुळे सामनाच रद्द झाला आणि दोघांना प्रत्येकी एकेक गुण मिळाला. त्यामुळे न्यूझीलंड, इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. न्यूझीलंडचे तीन तर इंग्लंड, आयर्लंड, ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत आणि दोनच संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. त्यामुळे आता एक जरी सामना गमावला किंवा पावसामुळे रद्द झाला तर एका मोठ्या संघाला बाहेर जावे लागणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाची निव्वळ सरासरी न्यूझीलंड, इंग्लंडपेक्षा कमजोर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com