T20 World Cup : रंगतदार सामन्यात भारताची बाजी, मात्र बांगलादेशनं टाकलं मागं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

t20 world cup 2022 points table group 2

T20 World Cup : रंगतदार सामन्यात भारताची बाजी, मात्र बांगलादेशनं टाकलं मागं!

T-20 World Cup 2022 Points Table Group-2 : टी-20 विश्वचषकाचा 17 वा सामना नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. होबार्टमध्ये शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने नेदरलँड्सवर 9 धावांनी विजय मिळवून विजयी सुरुवात केली. नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकांत आठ विकेट गमावत 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 20 षटकांत सर्वबाद 135 धावांवर आटोपला.

हेही वाचा: IND vs PAK : पराभव झोंबला! शोएब अख्तर 'त्या' नो-बॉलवरून अंपायरवर भडकला

बांगलादेशने या विजयासह केवळ गुणतालिकेत आपले खाते उघडले नाही तर भारताला खाली ओढले आहे. पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय नोंदवल्यानंतर, इतर चार संघांनी एकही सामना न खेळल्यामुळे टीम इंडिया 2 गुणांसह गट-2 गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. पण आज बांगलादेश विरुद्ध नेदरलँड सामन्यानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे.

हेही वाचा: Ind vs Pak : विराट तुसी ग्रेट हो...! टीम इंडियाचा जल्लोष... विजयाचा 'हा' व्हिडिओ चुकवू नका!

बांगलादेश आता सुपर-12 मधील गट-2 च्या गुणतालिकेत 2 गुण आणि 0.450 च्या निव्वळ धावगतीने अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताचेही दोन गुण आहेत, पण भारताचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा कमी आहे, त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताचा निव्वळ धावगती 0.050 आहे. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका गट-2 मध्ये आपला पहिला सामना खेळत आहेत, या सामन्यानंतर गुणतालिकेत आणखी बदल पाहायला मिळतील.