T20 World Cup 2022 : पात्रता फेरी संपली! भारताच्या ग्रुपमध्ये कोणते दोन संघ झाले दाखल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup 2022 Super 12 Group Teams

T20 World Cup 2022 : पात्रता फेरी संपली! भारताच्या ग्रुपमध्ये कोणते दोन संघ झाले दाखल?

T20 World Cup 2022 Super 12 Group Teams : ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी वर्ल्डकपची पात्रता फेरी 16 ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. आज झिम्बाब्वे आणि स्कॉटलँड यांच्यातील सामन्यानंतर ही पात्रता फेरी पूर्ण झाली. टी 20 वर्ल्डकपची पात्रता फेरी ही दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात आली होती. प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघाचा समावेश होता. त्यातील पहिल्या प्रत्येकी पहिल्या दोन संघांनी वर्ल्डकपच्या सुपर 12 मध्ये प्रवेश केला आहे.

पात्रता फेरीतील ग्रुप A मधून श्रीलंका आणि नेदरलँड हे दोन संघ प्रत्येकी 4 गुण घेत सुपर 12 साठी पात्र ठरले. तर ग्रुप B मध्ये आयर्लंने दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडीजला मात देत सुपर 12 मध्ये प्रवेश केला. तर झिम्बाब्वेने स्कॉटलँडचा पराभव करत सुपर 12 मध्ये जागा पक्की केली. ग्रुप A मध्ये नेट रनरेटच्या आधारावर श्रीलंका अव्वल स्थानावर राहिली तर नेदरलँड दुसऱ्या स्थानावर. तर ग्रुप B मध्ये झिम्बाब्वेने सरस नेट रनरेट राखत अव्वल स्थान पटकावले. आयर्लंड दुसऱ्या स्थानावर राहिली.

हेही वाचा: ZIM vs SCO Sikandar Raza : विजयाचा सिकंदर! झिम्बाब्वे पोहचली सुपर 12 मध्ये

पात्रता फेरी संपल्यानंतर सुपर 12 मध्ये कोणते संघ खेळणार हे निश्चित झाले आहे. सुपर 12 मधील ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील संघ पुढिल प्रमाणे..

सुपर 12 फेरीतील ग्रुप 1 मधील संघ

 • इंग्लंड

 • न्यूझीलंड

 • श्रीलंका

 • आयर्लंड

 • अफगाणिस्तान

 • ऑस्ट्रेलियात

सुपर 12 फेरीतील ग्रुप 2 मधील संघ

 • पाकिस्तान

 • दक्षिण आफ्रिका

 • नेदरलँड

 • झिम्बाब्वे

 • बांगलादेश

 • भारत

हेही वाचा: Milind Narvekar : क्रिकेटकारणातही मिलिंद नार्वेकरांचा बोलबाला…

टी 20 वर्ल्डकपमधील सुपर 12 च्या प्रत्येक ग्रुपमध्ये सहा संघाचां समावेश आहे. या ग्रुपमधील प्रत्येक संघ एकमेकांविरूद्ध एक - एक सामने खेळणार आहे. म्हणजे सुपर 12 मध्ये एक संघ पाच सामने खेळणार आहे. यानंतर दोन्ही ग्रुपमधील अव्वल दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र होतील. सुपर 12 मधील पहिला सामना हा उद्या (22 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारत सुपर 12 मधील आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबरला खेळणार आहे.

भारताचे सुपर 12 मधील सामने

 • 23 ऑक्टोबर, पाकिस्तान विरूद्ध, दुपारी 1.30 वाजता

 • 27 ऑक्टोबर, नेदरलँड विरूद्ध, दुपारी 12.30 वाजता

 • 30 ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध, दुपारी 4.30 वाजता

 • 02 नोव्हेंबर, बांगलादेश विरूद्ध, दुपारी 1.30 वाजता

 • 06 नोव्हेंबर, झिम्बाब्वे विरूद्ध, दुपारी 1.30 वाजता.