T20 World Cup : सेमी फायनलचा रणसंग्राम! भारत कोणाबरोबर खेळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup Semifinal Teams

T20 World Cup : सेमी फायनलचा रणसंग्राम! भारत कोणाबरोबर खेळणार?

T20 World Cup Semifinal Teams : टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत आणि पाकिस्तान गट-2 मधून पात्र ठरले आहेत, तर गट-1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. म्हणजेच आता टी-20 विश्वचषक 2022 च्या सेमी फायनलचा रणसंग्राम सुरू झाला आहे.

हेही वाचा: Hardik Pandya : पांड्या 'फ्री' हिटवर झाला हिट विकेट; पुन्हा चर्चांना उधाण मात्र नियम काय सांगतो?

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. ग्रुप-1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ -20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. ग्रुप-1 मधील टॉप न्यूझीलंडचा सामना ग्रुप-2 मधील दुसऱ्या स्थानावरील पाकिस्तानशी होणार आहे. ग्रुप-2 मधील टॉप टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी खेळणार आहे.

हेही वाचा: IND vs ZIM : ग्रुप 2 मध्ये भारतच किंग! पाकिस्तानकडून अव्वल स्थान हिसकावले

उपांत्य फेरीत गेलेले संघ

  • ग्रुप 1 : न्यूझीलंड, इंग्लंड

  • ग्रुप 2: भारत, पाकिस्तान

सेमी फायनलचा रणसंग्राम

  • न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - 9 नोव्हेंबर, सिडनी (दुपारी 1.30)

  • भारत विरुद्ध इंग्लंड - 10 नोव्हेंबर, अॅडलेड (दुपारी 1.30)