t20 world cup 2024 format participating teams host nations qualification process check all details
t20 world cup 2024 format participating teams host nations qualification process check all details

T20 World Cup 2024 : ICC ने बदलला T20 वर्ल्डकपचा फॉरमॅट, आता 'अशी' होईल पात्रता फेरी

Published on

T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2022 संपला आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. आता 2024 मध्ये या स्पर्धेची पुढील आवृत्ती खेळवली जाईल. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. यादरम्यान आयसीसीने या स्पर्धेसाठीचे नियम बदलले आहेत. T20 विश्वचषक 2022 मधील टॉप-8 संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. तर उर्वरित संघांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.

टॉप-12 संघांना थेट प्रवेश मिळेल

T20 विश्वचषक 2022 च्या टॉप-8 संघांव्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि बांगलादेशला थेट प्रवेश मिळेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिजशिवाय अमेरिका या विश्वचषकाचे आयोजन करत आहे. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजलाही थेट प्रवेश मिळणार आहे. 2024 च्या T20 विश्वचषकासाठी एकूण 12 संघ निश्चित करण्यात आले आहेत. दुसरीकडे, जर आपण T20 विश्वचषक 2024 बद्दल बोलायचे झाल्यास स्पर्धेत एकूण 20 संघ असतील. सध्या 20 संघांमध्ये 12 संघ निश्चित आहेत, मात्र पात्रता फेरीनंतर 8 संघ निश्चित केले जातील.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

t20 world cup 2024 format participating teams host nations qualification process check all details
Nitin Gadkari: कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमच्या आई-वडिलांपेक्षा…"
t20 world cup 2024 format participating teams host nations qualification process check all details
Nikhil Khadse Death : निखिल खडसेंची आत्महत्या की हत्या? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

असे असेल स्वरूप

T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 20 संघ असतील. या 20 संघांची प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागणी केली जाईल. त्याचबरोबर चारही गटांतील टॉप-2 संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील. अशाप्रकारे टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर-12 फेरी होणार नाही. सुपर-12 फेरीऐवजी सुपर-8 फेरी होईल. T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. या 55 सामन्यांपैकी सुमारे एक तृतीयांश सामने अमेरिकेत, तर उर्वरित सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. विशेष म्हणजे 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव झाला होता. तर अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com