Rinku Singh T20 WC 2024 : भारताची अवस्था होती 4 बाद 22 धावा, रिंकूच्या 69 धावांनी लाज वाचली... मात्र आता मिळाला डच्चू

Rinku Singh T20 WC 2024 Team India
Rinku Singh T20 WC 2024 Team India esakal

Rinku Singh T20 WC 2024 Team India : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा झाली. भारतीय संघात केकेआरचा स्टार मॅच फिनिशर रिंकू सिंह हा स्थान मिळवेल अशी आशा होती. मात्र तो थोडक्यात हुकला आहे.

निवडसमितीने रिंकू सिंहला स्टँड बायमध्ये ठेवण्यात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज शिवम दुबे याला संघात स्थान मिळालं आहे. त्याने यंदाच्या हंगामात धडाकेबाज फलंदाजी करत आपली योग्यता सिद्ध केली होती.

Rinku Singh T20 WC 2024 Team India
Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

निवडसमितीने भारताचा टी20 संघ घोषित केला. या संघात रिंकू सिंहच नाव स्टँडबाय मध्ये आहे. निवडसमितीने संघ निवडताना यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी प्रामुख्यानं लक्षात घेतल्याचं जाणवत आहे. यंदाच्या हंगामात रिंकू फारसा चमकला नाही. मात्र शिवम दुबेने दमदार फलंदाजी करत संघातील आपलं स्थान पक्क केलं. मॅच फिनिशर म्हणून या दोघांमध्येच स्पर्धा होती.

रिंकू सिंहने आयपीएलमधील आतापर्यंतच्या 9 सामन्यात 123 धावा करता आल्या आहेत. रिंकू सिंहला यंदाच्या हंगामात फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये अंबाती रायुडूबाबतही असंच काही झालं होतं.

रायुडू देखील आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानं चांगली कामगिरी करून देखील विजय शंकरला निवडसमितीने झुकतं माप दिलं होतं. असंच यंदाच्या निवडीवेळी रिंकू सिंहबाबत होत आहे. तो भारताच्या टी 20 संघात मॅच फिनिशर म्हणून चांगली कामगिरी करत होता.

Rinku Singh T20 WC 2024 Team India
T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

मात्र टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघात त्याला स्थान मिळालेलं नाही. रिंकू सिंहने भारताकडून खेळलेल्या गेल्या टी 20 सामन्यात 39 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली होती. भारताची अवस्था 4 बाद 22 धावा अशी अशताना रिंकूने झुंजार खेळी केली होती. मात्र आता त्याला भारतीय संघातून डच्चू मिळाला आहे.

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com