T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

South Africa Squad T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेने आगामी टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आपला 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
South Africa Squad T20 World Cup 2024 News Marathi
South Africa Squad T20 World Cup 2024 News Marathisakal

T20 World Cup 2024 South Africa Squad: दक्षिण आफ्रिकेने आगामी टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आपला 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ॲनरिक नॉर्टजेला संघात स्थान मिळालेले नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारे रायन रिकेल्टन आणि ओटनील बार्टमन या दोन अनकॅप्ड खेळाडूंचा वर्ल्ड कपसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी दक्षिण आफ्रिका संघ -

एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ स्टुब्सी, ट्रिबेझ स्टुब्सी. (South Africa Squad T20 World Cup 2024)

South Africa Squad T20 World Cup 2024 News Marathi
T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

2 अनकॅप्ड खेळाडू, एक गोलंदाज आणि एक फलंदाज

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये रायन रिकेल्टनने अप्रतिम फलंदाजी केली. या स्पर्धेत त्याने 173 च्या स्ट्राईक रेटने 530 धावा केल्या. रायन या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. याशिवाय ओटनील बार्टमनने या स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत गोलंदाजी करताना ओटनीलने 8 सामन्यात 18 विकेट घेतल्या होत्या.

South Africa Squad T20 World Cup 2024 News Marathi
T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

यावेळी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका संघाची कमान एडन मार्करामकडे सोपवण्यात आली आहे. आणि आयपीएल 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे अनेक फलंदाज अप्रतिम फलंदाजी करत आहेत. एडन मार्करामपासून हेनरिक क्लासेनपर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com