Sri Lanka On India-Pakistan Match Row
esakal
T20 World Cup 2026: टी-२० विश्वकप स्पर्धा सुरु व्हायला आता केवळ एक दिवस बाकी आहे. मात्र, या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार की नाही? हे अद्यापही निश्चित नाही. पाकिस्ताने भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहीत थेट जुन्या उपाकाराची आठवण करून दिली आहे.