VIDEO: पराभवानंतर बांगलादेश मध्ये शोककळा! खेळाडू अन् चाहते ढसाढसा रडले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup Bangladesh cricketers

VIDEO: पराभवानंतर बांगलादेश मध्ये शोककळा! खेळाडू अन् चाहते ढसाढसा रडले...

T20 World Cup Bangladesh : टी-20 विश्वचषक 2022 च्या 35 व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. भारताने या विजयानंतर उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. या सामन्यात भारतासाठी विराट कोहली-केएल राहुलने अर्धशतकं झळकावले. बांगलादेशनेही भारतीय चाहत्यांचे ठोके वाढवले ​​असले, तरी आपण दबावात तुटत नाही तर आणखी चमक दाखवतो हे अर्शदीप सिंगने पुन्हा एकदा दाखवून दिले.

हेही वाचा: Shakib Al Hasan : फुशारक्या मारणारा शाकिब भारताविरूद्धच्या पराभवानंतर म्हणतो...

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमामुळे बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने चांगली सुरूवात केली. सामना जिंकतात का काय असे वाटत होते. पण पावसाने खेळ फिरवला आणि बांगलादेशने सामना गमावला. या सामन्यातील पराभवानंतर बांगलादेशी चाहते आणि खेळाडूंमध्ये शोककळा पसरली होती.

हेही वाचा: T20 World Cup : भारत पोहचणार! पाकिस्तानला अजूनही आहे का सेमी फायनलची संधी?

भारत जिंकताच कॅमेरामनचे लक्ष डगआउटवर गेले आणि बांगलादेशात उभे राहिले जेथे चाहते आणि खेळाडू रडताना दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते त्याला खूप शेअर करत आहेत.