T20 World Cup: 'काहीही झालं तरी चालेल भारत पाकिस्तान फायनल...' बटलरचं बोललाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup

T20 World Cup: 'काहीही झालं तरी चालेल भारत पाकिस्तान फायनल...' बटलरचं बोललाच!

T20 World Cup England Player Jos buttler: आयसीसी टी २० वर्ल्ड कप हा आता रंगतदार स्थितीत आला आहे. सुरुवातीच्या साखळी सामन्यांपासून भारतानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. अशावेळी भारत सेमीफायनलपर्यत जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र तो प्रश्न निकाली निघाला आहे. भारताचा सेमीफायनलचा सामना हा उद्या इंग्लंडसोबत होणार आहे. याचवेळी इंग्लंडच्या कॅप्टननं जॉस बटलरनं एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

भारत सेमिफायनलपर्यत गेला असून आता तो फायनलमध्ये जाणार का आणि पुन्हा एकदा तो विश्वकरंडकावर आपलं नाव कोरणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र यासगळ्यात एक गोष्ट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचा थरार पाहायला मिळणार की नाही याविषयीची.. यासगळ्यावर इंग्लंडच्या कर्णधारानं बटरलनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यानं आता मैदानावरील युद्धापूर्वी सोशल मीडियावर वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे.

हेही वाचा- बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

आज न्युझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सेमिफायनलचा पहिला सामना आहे. त्यांच्यातील विजेता हा अंतिम फेरीत जाणार. आता तो संघ पाकिस्तानचा असावा अशी अनेक क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. कारण त्यांना पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पाहायचा आहे. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या या सामन्याची कित्येकजण वाट पाहत आहेत. दुसरीकडे भारताची लढत उद्या इंग्लंडसोबत होणारर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावर क्रिकेटरसिकांचे विशेष लक्ष असणार आहे.

पहिला सेमिफायनलचा सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. तर दुसरा अॅडलेडवर होणार आहे. न्युझीलंडनं ७ गुण मिळवत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. सेमिफायनलमध्ये जाणारी ती पहिली टीम ठरली आहे. इंग्लंडचे देखील ७ गुण होते मात्र न्युझीलंडचा रनरेट जास्त असल्यानं त्यांनी बाजी मारली. बटरलनं आता उद्याच्या लढतीपूर्वी वेगळ्या प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे ते विधान चर्चेत आले आहे.

हेही वाचा: Viral: अधिकारी तर्राट झाला, दुसऱ्याच महिलेच्या बेडवर झोपला!

बटलरनं म्हटले आहे की, काहीही झालं तरी चालेल आम्ही भारत आणि पाकिस्तान फायनल होऊ देणार नाही. आमचा प्रयत्न भारताला पराभूत करण्याचा असणार आहे. ही फायनल होणार नाही यासाठी आम्हालाच विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अशी टिप्पणी बटलरनं केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. प्रत्यक्षात उद्या काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: Sanjana Genshan: 'मी सुंदर नाही म्हणतो, तुझा चेहरा चपलेसारखा' बुमराहच्या बायकोचा 'यॉर्कर'