esakal | T20 WC squad : कुणाला मिळणार संधी? कोण आहे दावेदार, जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

T20 WC squad : कुणाला मिळणार संधी? कोण आहे दावेदार, जाणून घ्या

T20 WC squad : कुणाला मिळणार संधी? कोण आहे दावेदार, जाणून घ्या

sakal_logo
By
नामदेव कुंभार

India T20 World Cup squad : टी-20 विश्वचषक 17 ते आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएई आणि ओमनच्या मैदानात रंगणार आहे. विश्वचषकासाठी चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बुधवारी मुंबईच्या बीसीसीआयचीच्या (BCCI) मुख्य कार्यलयात बैठक घेणार असल्याची चर्चा आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेला कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ऑनलाईन या बैठकीत सहभागी होणार असल्याचेही बोलले जात आहे. यांच्याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचाही या बैठकीत सहभाग असेल. या बैठकीत भारताच्या संघाची घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियावर प्रत्येकजण आपला संभाव्य भारतीय संघ निवडत आहे. कुणाला संधी मिळणार अन् कुणाला डावलले जाणार? याबाबतची माहिती आज संध्याकाळीच मिळेल. पाहूयात संभाव्य भारतीय संघ...

फलंदाज -

विराट कोहली (कर्णधार),रोहित शर्मा (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर

यष्टीरक्षक -

ऋषभ पंत, के. एल राहुल

अष्टपैलू -

हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर

वेगवान गोलंदाज -

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर

फिरकीपटू -

युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती

स्टँडबाय -

राहुल चाहर/कुलदीप यादव

देवदत्त पडीक्कल/शिखर धवन/पृथ्वी शॉ/मनिष पांडे

अक्षर पटेल/क्रृणाल पांड्या/ राहुल तेवातिया

संजू सॅमसन/इशान किशन

नटराजन/प्रसिद्ध कृष्णा/मोहम्मद सिराज

हेही वाचा: गावसकरांनी निवडला T20 WC चा संघ; धवन, श्रेयसला डावलले

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीस संघांची आज घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआय 18 ते 20 सदस्यांची घोषणा करु शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने 23 ऐवजी 30 सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. यात स्टाफ सदस्यांचाही समावेश असेल. एखादा संघ 30 पेक्षा अधिक खेळाडू आपल्या ताफ्यात ठेवू शकतो, मात्र त्याचा खर्च हा संबंधित देशाच्या क्रिकेट बोर्डाला उचलावा लागेल.

loading image
go to top